Home Breaking News भारतीय संविधानिक मूल्य-विचारांशी छेडछाड देशाच्या अखंडतेला घातक : ऍड.असीम सरोदे

भारतीय संविधानिक मूल्य-विचारांशी छेडछाड देशाच्या अखंडतेला घातक : ऍड.असीम सरोदे

75

नाशिक शांताराम दुनबळे़
नाशिक-: भारतीय लोकांना लोकशाही खेरीज कोणतीच शाही मानवणारी वा परवडणारी नसून भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेतील धर्मनिरपेक्ष व समाजवादी शब्दांना असंविधानिक पद्धतीने उदेशपत्रिकेतून काढून टाकणे हा देशद्रोह आहे.संविधानात नव्याने होणाऱ्या प्रत्येक शब्द-कायदे योजना ह्या संसदेच्या दोन्ही सभागृहात विचारविनिमय-चर्चा संवाद करूनच बहुमताने काढता अथवा नव्याने समाविष्ट करण्यात येतात त्यासाठी संविधानिक नीतिनियम कायदे अस्तित्वात असून नव्या संसद भवनात भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेशी छेडछाड होत असून बहु भाषा,वेशभूषा,प्रथा-परंपरा असणाऱ्या भारत देशात जे भारतीय संविधान भारतीय नागरिकाला धार्मिक,राजकीय,आर्थिक स्वातंत्र्य आचार-विचार,उच्चार विहाराचे हर नागरिकाला दिलेले हक्क इथले राज्यकर्ते नष्ट करू पहात असून देशाला धर्मांध करून संविधानिक हक्क अधिकार मागणाऱ्या नागरिकांची मुस्कट दाबी करत असल्याचे मत सुप्रसिद्ध विधीतज्ञ व संविधान अभ्यासक ऍड.असीम सरोदे यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारक येवला येथे आयोजित लोकसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
भारतीय समाज जीवन हे निसर्गाधीन जीवन जगत आला असून समता, स्वातंत्र्य,न्याय, बंधुता,एकता-एकात्मता,मानवता,विवेकवादी विचार हे ह्या भारतभूमीची खरी संपत्ती आहे किंबहुना तो भारतीयांचा श्वास आहे,हे तत्व-विचारच भारतीय संविधानाने कायदे स्वरूपात भारतीय संविधानात लिहिले आहे.त्याची अंमलबजावणी, काटेकोर पालन हेच देशाचे अखंडत्व कायम ठेवेल असे सांगत भारतीय नागरिक संविधानिक हक्क अधिकार व आपल्या कर्तव्यप्रति जागरूक होणे आवश्यक असून धार्मिक सलोखा राखत धर्मनिरपेक्षता व समाजवादी समाज व्यवस्थाच देशाला तारक आहे असे सरोदे म्हणाले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालयात तथा कर्डक अभ्यासिकेस त्यांनी ह्यावेळी सदिच्छा भेट दिली.जात-धर्मांध लोक विवेकी विचारला घाबरतात कुणी कितीही हिंसक भाषा-उच्चार व्यवहार करत असले तरी आपण शांत-सयंत माणसाला जोडणारी वाणी-करणी सोडता कामा नसल्याचे सांगून धर्माच्या नावावर भारत देश दुभंगू देऊ नका,मानवता,समता व एकमेकांच्या धर्मांचा सन्मान हाच संविधानाचा गाभा असल्याचे मत सरोदे यांनी ह्यावेळी बोलतांना मांडले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालयात तथा कर्डक अभ्यासिकेसचे संस्थापक शरद शेजवळ यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश वाघ होते.सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा तायडे,ऍड.बाळकृष्ण निढाळकर,नगरसेवक संजय भालेराव,गुरू निकाळे,अमीन शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.ऐतिहासिक मुक्तीभूमी स्मारक परिसरात ऍड सरोदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले मुक्तीभूमी अभ्यासिकेचे विद्यार्थी राजरत्न वाहुळ व शुभांगी मढवई यांचा सत्कार ह्यावेळी ऍड असीम सरोदे यांचे हस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन राजरत्न वाहुळ यांनी केले.आभार सुरेश खळे यांनी मानले. विकास वाहूळ,सुरेश खळे,महेंद्र पगारे,सुभाष गांगुर्डे,सिद्धार्थ हिरे,मढवई,रईस मौलवी,सबूर मोमीन,सुरेश सोनवणे,शेख मोबीन अहमद,
फिरोज खान,नाना पगारे,निजामुद्दीन शेख,अल्ताफ शेख,रफिक भाई पठाण
अशोक पगारे,डॉ.केदारे,रामचंद्र गायकवाड,बाळासाहेब गांगुर्डे,अजीज भाई शेख,हर्षल घोडेराव,डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारक समिती अधिकारी कर्मचारी व भगवान साबळे,महेन्द्रं पगारे , हिरामण मेश्राम,संगीता वाहूळ,शुभांगी मढवई,जयश्री सदाफळ,रितू गोरे,ललित भांबेरे,सुमित गरुड,समाधान निकाळे,राजू गरुड,पवन दळे,कृष्णा जगताप,सचिन गरुड,ऋषी शेळके,ऋषी गायकवाड इ.नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here