Home महाराष्ट्र उमरखेड सत्यरूख हॉस्पिटल इथल्या डॉक्टरची हलगर्जी मुळे महिलेचा मृत्यू

उमरखेड सत्यरूख हॉस्पिटल इथल्या डॉक्टरची हलगर्जी मुळे महिलेचा मृत्यू

74

✒️ सिध्दार्थ दिवेकर (प्रतिनिधी उमरखेड)

उमरखेड(दि. 30 ऑगस्ट):- सिझर झालेल्या महिलेचा नांदेडला नेतांना तिसऱ्या दिवशी मृत्यु दि. 30/8/23 रोजी चुकीच्या उपचारामुळेच मृत्यु झाल्याचा नातेवाईकांचा आरोप संतप्त नाईवाईकांची हॉस्पीटल समोर गर्दी सत्यरूख हॉस्पीटल समोर अॅम्ब्यूलन्स मध्ये मृत्तदेह ठेऊन ठिय्या हॉस्पीटल समोर तणाव..
उमरखेड येथील सत्यरूख हॉस्पीटलमध्ये बाळंतपणासाठी आलेल्या महागाव तालुक्यातील कोठारी येथील रेखा गजानन येनकर या 30 वर्षीय महिलेवर दि. 28 रोजी सिझर सर्जरी केल्यानंतर मातेने मुलीला जन्म दिला त्या नंतर उपचार सत्यरूख हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी तिचेवर उपचार केले परंतु तिची प्रकृती खालावत चालल्याने दि. 30 रोजी संबंधित डॉक्टरांनी तिला नांदेडला हलविण्याचा सल्ला दिला व डॉक्टरांनी नांदेड येथून खासगी अॅम्ब्युलन्स बोलावून तिला यशोसाई हॉस्पीटल नांदेडकडे घेऊन जात असतांना वाटेतच मृत्यू झाला . या व मृतदेहाचे शवविच्छेदन नांदेडच्या शासकिय रुग्णालयात करण्यात आले.

चुकीच्या निदानामुळे झालेल्या मृत्यूस जबाबदार असलेल्या सत्यरुख हॉस्पीटलच्या संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी संतप्त झालेल्या नातेवाईकांनी शववाहिका सत्यरुख हॉस्पीटल समोर आणली.

व संबंधीत डॉक्टरांवर प्रश्नांचा भडीमार केला तेव्हा सत्यरूख हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी पोलीसांना पाचारण केले. पोलीसांनी मृत्तदेह हॉस्पीटलमध्ये आणण्यास मज्जाव केला.

त्यानंतर उमरखेड पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी नातेवाईक पोहचले . वृत्त लिहीपर्यन्त पोलीस स्टेशनला फिर्याद प्रक्रिया सुरु होती . घटनेचे वृत्त कळताच सत्यरूख हॉस्पीटल समोर मोठी गर्दी होती.अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here