(गाव तिथे शाखा घर तिथे कार्यकर्ता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद)
सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि. 28 ऑगस्ट):-गाव तिथे शाखा घर तिथं कार्यकर्ता या अभियानांतर्गत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून मौजे हातला तालुका उमरखेड येथे विविध जाती धर्मातील समूहातील शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करून हातला येथे दि.28 ऑगस्ट सोमवारला वंचित बहुजन आघाडीच्या ग्राम शाखेची स्थापना करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रभारी मोहन राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद राऊत, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावते जिल्हा महासचिव जॉन्टी विणकरे, जिल्हा संघटक ज्ञानदीप कांबळे , जिल्हा कोषाध्यक्ष सतीश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड तालुका प्रमुख संतोष जोगदंड त्यांच्या नेतृत्वात हातला गावातील शेकडो तरुणांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश घेतला.
या वेळी उमरखेड तालुक्यातील प्रत्येक गावात वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात येणार असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकतीने लढणार असल्याचे प्रतिपादन तालुका अध्यक्ष संतोष जोगदंड यांनी केले.
यावेळी तालुका महासचिव देवानंद पाईकराव,सभापती संबोधी गायकवाड, विष्णूकांत वाढेकर, बाबुराव नवसागरे, सचिन वाहुळे, विश्वास धुळे, विनोद गाडगे, पंकज गायकवाड, रवींद्र हापसे यांच्यासह हातला येथील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.