




✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि. 28 ऑगस्ट):-मराठी साहित्य ज्या वेळेस रंजनवाद आणि धार्मिक वादात होता त्या वेळेस अण्णाभाऊ यांची लेखणी कामगारांचे कष्टकऱ्यांची आंदोलन तर भुकेचे प्रश्न आपल्या लेखणीतून सर्वप्रथम मांडून मराठी साहित्य विश्वाला समृद्ध केल्यामुळे ते मराठी साहित्यातील ध्रुवतारा असल्याचे प्रतिपादन जागतीक साहित्यीक प्रा.डॉ. अनिल काळबांडे यांनी केले.
ते तालुक्यातील साखरा येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.या वेळी पत्रकार राजु गायकवाड यांनी शिक्षणाचे महत्व सांगून आपले मोठे बंधु बौद्ध समाजाचा आदर्श घेऊन शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन केले.
तर पत्रकार दत्तराव काळे यांनी समाजाला एकसंघ राहण्याचे सांगीतले.या सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाईकराव, राहूल काळबांडे, सायली शिंदे, सुधाकर कांबळे यांनी ही आपले विचार व्यक्त केले . या कार्यक्रमाचे आयोजन अण्णाभाऊ साठे मंडळ अध्यक्ष साखरा सुरेश हिंगडे,तुकाराम हिंगडे, विश्वनाथ हिंगडे, दत्तराव हिंगडे, हरिभाऊ हिंगडे, लक्ष्मण हिंगडे, कृष्णा हिंगडे, अशोक हिंगडे, पिंटू हिंगडे, पांडुरंग हिंगडे, साईप्रसाद हिंगडे, भीमराव हिंगडे, जयराम हिंगडे, चांदराव हिंगडे, विठ्ठल रामकिसन वंजारे नामदेव हिंगडे,अशोक काळे, दिलीप धाडे,दीपक भांडवले, संभा हिंगडे, श्रीधर हिंगडे ,दिलीप हिंगडे, विजय हिंगडे, अजय हिंगडे , नारायण हिंगाडे यांनी केले तर सूत्रसंचालन चांदराव बनसोडे आभार उत्तम हिंगडे यांनी केले.

