Home महाराष्ट्र महायुती सरकारमुळे शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले : खा.शरद पवार

महायुती सरकारमुळे शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले : खा.शरद पवार

55

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

🔸शेतकरी आत्महत्या सर्वात जास्त या सरकारच्या काळात झाल्या

म्हसवड(दि.26ऑगस्ट):-आमची सत्ता असताना शेतकरी सुखी होता शेतकऱ्यांच्या मालाला दर होता. भाजप सरकारने शेतकऱ्याच्या शेतमालावर कर लावला आणि मालाला दरही दिला नाही. त्यामुळे या सरकारच्या काळात शेतकऱ्याला वाईट दिवस आले आणि सर्वात जास्त आत्महत्याही झाल्या असे उदगार खासदार शरद पवार यांनी आज दहिवडी येथील आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता संवाद मेळावा दरम्यान केले.

यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा.श्रीनिवास पाटील,कर्जत जामखेडचे आ.रोहित पवार,आ. शशिकांत शिंदे, आ.बाळासाहेब पाटील,सारंग पाटील,प्रभाकर देशमुख,सुनील माने उपस्थित होते. पुढे बोलताना खा.पवार म्हणाले की, तुम्हाला काय मदत करता येईल या हेतूने आलोय. आमचे सहकारी सदाशिवराव पोळ यांच्या पाठीशी तुम्ही ताकद उभी केली होती यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पाठीशी माण तालुका कायम राहिला. त्यामुळं आमचं कर्तव्य आहे इथल्या लोकांच्या पाठीशी राहणं. ज्याच्या हातात सत्ता आहे त्यांची जबाबदारी आहे इथल्या जनतेकडे लक्ष देण्याची प्रश्न सोडविण्याची मात्र या सरकारकडे जनतेकडे डोकूनही पाहण्याची भूमिका नाही.

दुष्काळी भागातील शेतकरी अडचणीत आहे. बँकेचे कर्ज डोक्यावर आहे असे अनेक प्रश्न आहेत. केंद्र सरकारने कांद्यावर 40% निर्यात कर बसविला..माझं त्यांना सांगणे आहे शरद पवारने कांद्यावर कर कधीही लावला नाही. कांद्याचे सर्व पैसे कष्टकरी शेतकऱयाच्या घरात जात होते. जे सरकार शेतकऱ्याकडे लक्ष देणार नाही हे आम्ही कदापी खपवून घेणार नाही. आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून महाराष्ट्राला चांगले सरकार देण्याचं प्रयत्न केला. हिंदुस्थान मधील वेगवेगळ्या प्रांतामध्ये महिलांची नग्न धिंड काढली जात आहे मात्र केंद्रातील सरकार फक्त बघ्याची भूमिका घेताय. नागालँड,मणिपूर, सिक्कीम ही ठिकाण चीनच्या जवळ आहेत. त्याच्या सुरक्षिते बाबत केंद्र सरकार ढुंकूनही पाहत नाही. तुमच्या अडचणी वाढवण्याचे कामं या सरकारकडून सुरु आहे. पक्ष फोडू सरकार विरोधात सर्व जनतेने एकत्र येऊन या सरकार ला त्याची जागा दाखवून देऊ.

एकत्र येऊन दाखवून देऊ हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं होतं आणि इथून पुढे असणार अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलताना म्हणाले की, खासदार कसे हवेत याचे मूर्तिमंत उदाहरणं श्रीनिवास पाटील. सातारकर भरभरून प्रेम करतात या खासदारावर अशी स्तुती देखील केली.पावसाने ओढ दिल्याने भीषण परिस्थिती आहे.गेल्या दोन महिन्यात दुष्काळचे सावट पसरत चाललाय. आपले सरकार सत्तेत असताना दुष्काळ पडला होता तेव्हा प्रचंड प्रमाणात मदत करण्याचे कामं पवार साहेबांनी केले होते. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार म्हणाले की, पालकमंत्री किती वेळा आले.दुष्काळाची दाहकता वाढत चाललीय केंद्रासरकारने कांद्याच्या निर्णयटीवर बंदी आणली. त्यावेळी मंत्री श्रेयवादासाठी भांडत होते. आ.बाळासाहेब पाटील म्हणाले की, अश्या प्रकारचा उत्साह पहिल्यांदाच पाहायला मिळाला.

प्रत्येक ठिकाणी तोडफोडीच राजकारण करण्याचं प्रयत्न भाजपा कडून केला जात आहे. माण मधील जनता कधीही संकटाना डगमगली नाही. मुलींच्या शिक्षणाची सोय चांगली व्हावी तालुक्यातून खूप अधिकारी घडवले जावेत यासाठी प्रभाकर देशमुखांनी अनेकदा खूप प्रयत्न केले आहेत असे आव्हान बाळासाहेब पाटील यांनी केले. आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, या सभेला जाऊ नका म्हणून इतका दबाव आणण्यात आला होता. परंतु आम्ही पवार साहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आहोत त्यामुळे आम्हाला कोणीही अडवू शकत नाही. दहिवडी नगरपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन काल भारतीय जनता पार्टीने श्रेय वादातून तृतीयपंथीयांच्या हस्ते करून घेतले परंतु त्यांना हे माहीत नसेल की तृतीयपांठ्यांची पाहिली संघटना सुप्रिया सुळे यांच्या मुळे उभी राहिली. त्यामुळे ते तृतीय रवी जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच पाठिंबा आहे. त्यामुळे ते व उद्घाटन देखील आमच्या पार्टीने केली असा मी समजतो असे शशिकांत शिंदे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here