Home महाराष्ट्र संत्रा गळतीचे सर्वेक्षण करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत...

संत्रा गळतीचे सर्वेक्षण करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत देण्याची मागणी !

28

🔸मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी सर्वेक्षणाच्या प्रतीक्षेत !

🔹राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.26ऑगस्ट):- तालुक्यामध्ये एप्रिल मे महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांच्या आंबिया बहार संत्राचे नुकसान झाले असून आता पुन्हा जून जुलै महिन्या मध्ये सततच्या पावसामुळे संत्रा पिकांचे अतोनात नुकसान झाले. एप्रिल मे महिन्यात झालेल्या अवकाळी पासून व गारपिटीमुळे यावर्षी संत्राचा मृग बहार फुटला नसल्यामुळे मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला असून कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे.

संत्रा झाडांवर असलेल्या आंबिया बहाराच्या संत्राला अचानक गळती लागली असून संत्रा बागेत मोठ्या प्रमाणात साचून राहिलेले पावसाच्या पाण्याने संत्रा झाडे क्षतिग्रस्त होऊन तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात संत्रा बागांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे मोर्शी तालुक्यात कृषी विभागामार्फत सर्वे करून पंचनामे करण्यात करून संत्रा उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांच्या नेतृत्वात मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकर्‍यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणविस, कृषी मंत्री धनंजय मुंडे, विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

मोर्शी तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून अलीकडे अनेक कारणाने संत्रा उत्पादकांवर संकट कोसळत आहे. कधी गारपीट तर कधी कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, अज्ञात रोगाचे थैमान, संत्रा गळती, गारपीट, कोरोना व्हायरस , तापमान वाढ , विविध नैसर्गिक संकट, आनी आता अज्ञात रोगाचा प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात आंबिया बहाराच्या संत्राला गळती लागल्यामुळे तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. एकेकाळी विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा हा भाग आणि या भागातील संत्रा उत्पादकांची आजची स्थिती फारच वाईट आणि दयनीय झाली आहे. आंबिया बहाराच्या संत्राला मोठ्या प्रमाणात गळती गळती लागली असून संत्रा झाडाची पाने पिवळी पडून गळत आहे सोबतच संत्राच्या झाडांच्या फांद्या वाळण्याचे प्रमाण वाढले आहे या अज्ञात रोगामुळे मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

नैसर्गिक भीषण संकटांचा मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादकांना जबर फटका बसला असून कोट्यवधी रुपयांच्या संत्राचे नुकसान झाले आहे. आंबियाच्या गळतीचे सर्वेक्षण करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, संत्रावरील विवीध रोगांवर संशोधन करून संशोधकांनी तात्काळ उपाय योजना सुचविण्यासाठी मोर्शी येथे तज्ञांचे मार्गदर्शन केंद्र सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक उमेश गुडधे, अंकुश घारड अशोक ठोंबरे, विलास ठाकरे, यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी !

यंदा आंबिया बहर संत्राचे उत्पादन चांगले होण्याची आशा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होती. संत्राला चांगला भाव मिळून हाती पैसा येईल, या आशेवर असलेला शेतकरी वादळी अवकाळी पाऊस, गारपीट, आंबिया बहराला गळतीमुळे हवालदिल झाला आहे. नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले असून सततच्या नैसर्गिक संकटांचा सामना करताना शेतकरी हैराण झाला असल्यामुळे शासनाने आता सर्वेक्षण करून त्वरित आर्थिक मदत द्यायला हवी.” – रूपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here