अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.17ऑगस्ट);-दि.(15/08/2023) येथे संपन्न झालेल्या महाकवी वामनदादा कर्डक यांच्या 101 व्या जयंती महोत्सवात सुप्रसिद्ध साहित्यकार नारायण जाधव यांनी वरील वक्तव्य केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी फुले शाहू आंबेडकरी साहित्यकार प्रा.डॉ.एम.डी.इंगोले यांची उपस्थिती होती.पुढे बोलत असताना ते म्हणाले की, वामनदादा कर्डक गंभीर पणे समजून घेण्याचा विषय आहे. वामनदादांच्या काव्य रथाची चळवळ प्रबोधन आणि परिवर्तन ची दोन चाके आहेत.ती सम्राट अशोकांच्या धम्मचक्रा प्रमाणे सतत गतीने फिरत राहिली. वामनदादा हे अशिक्षित असूनही ते प्रतिभावंत महाकवी होते. त्यांची प्रतीभा ही उत्कट, कठोर व अतुलनीय असून ते भविष्य द्रष्टा होते.
आपल्या काव्यातून “खाऊजा” धोरणावर त्यांनी केलेले वक्तव्य आज परिस्थितीला खरे ठरताना दिसून येते.वामनदादांच्या गीतांचे अनेक पैलू मा.नारायण जाधव यांनी सौदाहरण सहित,गोड आवाजात व साभिनय प्रस्तुत केले.वामनदादांशी त्यांचे नाते कसे जडले,बुलढाणा येथे वामनदादांचा अविस्मरणीय असा सत्कार सोहळा कसा संपन्न झाला या विषयी सविस्ताराने सांगितले. महाकरि वामनदादा कर्डक जयंती उत्सवाचे मुख्य प्रवर्तक वामनदादांचे चाहते,सेवक, सामाजिक कार्यकर्ते मा.विलास अण्णा जंगले यांनीही वामनदादांच्या आठवणी सांगितल्या व पाहुण्यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रो.डॉ.एम.डी.इंगोले यांनी वामनदादांच्या काव्यातील विविध पैलूंचे काव्य शास्त्रीय
विवेचन केले.या प्रसंगी कवी, लेखक प्रेमानंद बनसोडे यांनी वामनदादा हे बुद्ध, कबीर, फुले, छ.शाहू,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा काव्याचा माध्यमातून कसा चालवला यावर प्रकाश टाकला. विद्युत महावितरण अभियंता मा.नितेश भसारकर यांनीही वामनदादां विषयी आपले मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी सारनाथ विद्यालयाचे संस्थाचालक मा.संभाजी पंचांगे यांचीही उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.जी.वाळवंटे यांनी केले.सूत्र संचालन लक्ष्मण वाव्हळे यांनी तर आभार आर.जी.मस्के यांनी मानले.व्याख्यानानंतर रात्री भीमगीत संगीत रजनीचे आयोजनामध्ये भीमशाहीर प्रेमानंद मस्के,भीमशाहीर प्रा.भगवान गायकवाड यांनी बहारदार गीते सादर वामनदादा कडकांच्या आठवणींना उजाळा दिला.
महाकवी वामनदादा कर्डक जयंती उत्सवाचे मुख्यप्रवर्तक आयु.विलासराव जंगले (आण्णा)जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,जयंती मंडाळाचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे,प्रा.भगवान गायकवाड,लक्ष्मण व्हावळे,गुणवंत कांबळे,डी. जी. वाळवंटे,आर.जी. मस्के,राम सावंत,राजेश समुद्रे,राहुल गायकवाड,विलास जाधव,महादेव वावळे,राहूल साबणे,बाळासाहेब जंगले,ऊमाकांत हेंगडे,सुशिल सावंत’ शंकर साबळे यांनी जयंती सोहळ्याच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
