Home महाराष्ट्र आष्टी ग्रा.पं. भष्ट्राचार चौकशी समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा-राष्ट्रवादी कांग्रेस शहर अध्यक्ष राहुल...

आष्टी ग्रा.पं. भष्ट्राचार चौकशी समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा-राष्ट्रवादी कांग्रेस शहर अध्यक्ष राहुल डांगे

130

🔸…अन्यथा न्यायालयात दाद मागणार मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन सादर

✒️चामोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

चामोर्शी (गडचिरोली)(दि.13ऑगस्ट):- तालुक्यातील आष्टी ग्राम पंचायत च्या दुकान गाळे बांधकामात मोठ्या प्रमाणावर भष्ट्राचार झाल्याची तक्रार झाल्यानंतर पंचायत समिती स्तरावरील व त्यानंतर जिल्हा परिषद स्तरावर चौकशी नेमन्यात आली होती. जिल्हास्तरीय चौकशी समितीने २४ एप्रिल २०२३ रोजी जिल्हा परिषदकडे अहवाल सादर केला. मात्र अजुन पर्यंत त्या अहवालानुसार कारवाही करण्यात आलेली नाही. त्या अहवालाची अंमलबजाणी करून दोषिंवर कारवाही करावी, अन्यथा न्यायालयात दाद मागण्यात येईल अश्या आशयाचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती आष्टी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष राहुल डांगे यांनी दिली.

 

गडचिरोली जिल्हा परिषद स्तरीय चौकशी अहवाल पत्र जावक क्रमांक / पं.स. आ / पंचा/ स्था-1 / चौकशी 455/2023 R 24/04/2023 नूसार आष्टी ग्राम पंचायत दुकान गाळे बांधकामत झालेल्या भष्ट्राचारात अनेकजन दोषी असुन त्या अहवालाची अंमलबजावणी का करण्यात आली नाही? याबाबत चामोर्शी तालुक्यात खमंग चार्चा सुरू असतांना आता राहुल डांगे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे चौकशी समिती अहवालाची अंमलबजाणीची मागणी केल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेत खडबळ माजली आहे.

राहुल डांगे (राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहर अध्यक्ष आष्टी) यांनी आष्टी ग्रामपंचायत येथील झालेल्या गाळे बांधकाम भ्रष्टाचार संदर्भात या बांधकामाची जिल्हा परिषद स्तरावरून चौकशी करण्याची मागणी केली होती. त्या मागणी नुसार मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी एक चौकशी समिती गठीत केली होती. त्या चौकशी समितीने आष्टी ग्रामपंचायत येथील गाळे बांधकामांची चौकशी करून अहवाल मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दि. 24 एप्रिल 2023 ला सादर केला. त्या अहवाला नुसार चामोर्शी पंचायत समिती कार्यालय शाखा अभियंता, चामोर्शी, तत्कालीन ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांना दोषी ठरविण्यात आले. तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती चामोर्शी स्तरावरून एक चौकशी समिती नेमली होती परंतु त्या समितीने दोषींना अभय देण्याचे काम केले होते. या चौकशी समितीला पण दोषी ठरविण्यात यावे. अशीसुध्दा मागणी केली आहे.

चौकशी अहवाल मुख्य कार्यपालन अधिकारी यांना तीन ते चार महिने सादर होऊन हि दोषीवर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने लक्ष देऊन भ्रष्टाचारात लिप्त अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी. दि. १० आक्टोंबर २०२३ पर्यंत योग्य कार्यवाही न केल्यास न्याय मागण्यासाठी न्यायालयात जावे लागेल असे राहुल डांगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here