Home महाराष्ट्र गंगाखेड मध्ये पंजाब पोलीस दाखल-तालुक्यात आले चर्चेला उधान

गंगाखेड मध्ये पंजाब पोलीस दाखल-तालुक्यात आले चर्चेला उधान

56

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.13ऑगस्ट):- तालुक्यात वेगवेगळ्या तपास यंत्रणांचे दर्शन होत आहेत .येथील नागरिकांनी सी.बी.आय, ईडी अशा तपास यंत्रणांची नावे फक्त ऐकत होते पण ते प्रत्यक्ष तालुक्यातील जनतेने बघितले आणि आता चक्क पंजाब पोलीसच गंगाखेड मध्ये एका उद्योगपतीच्या शोदात आल्याची माहिती पोलिसांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगून तो उद्योगपती कोण याची गुप्तता मात्र पाळली.

 

पंजाब पोलिसांचे पथक गंगाखेड मधील तो उद्योगपती शोधण्यासाठी सर्च वॉरंट घेऊन गंगाखेडमध्ये दाखल झाले असता या उद्योगपतीला आपल्याला पकडण्यासाठी पंजाब पोलीस आल्याची कुंनकुन लागली असावी तेंव्हा उद्योगपती पोबारा झाला असेल असी जनते मध्ये चर्चा होताना दिसते या मुळे पंजाब पोलीस रिकाम्या हाताने परतले अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली.

 

गंगाखेड तालुका विकासाच्या इतर बाबतीत जरी मागे असला तरी आशा प्रकरणात मध्ये मात्र अव्वलस्थानी असतो या प्रकरणावरून दिसते. परंतु 107 सारख्या साध्या गुन्ह्यातील आरोपीला पोलीस तात्काळ अटक करून आणतात. आसे का तर त्याचा हाच गुन्हा की तो गरीब असतो त्याला कोणाचा राजकीय वरदहस्त नसतो. हा उद्योगपती कोण याचा सस्पेन्स कायम आहे पण काही झालं तरी “कानून के हात लंबे होते है ” हा फिल्मी डायलॉग पंजाब पोलिसांनी खरा करून दाखवावा व तो बडा उद्योगपती कोण हे जनतेच्या समोर आणावे अशी चर्चा तालुक्यात सर्वत्र होताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here