Home अमरावती प्रा.अरुण बुंदेले बहुआयाम व्यक्तिमत्त्व – डॉ.गोविद कासट

प्रा.अरुण बुंदेले बहुआयाम व्यक्तिमत्त्व – डॉ.गोविद कासट

94

🔸” डॉ.गोविंद कासट मित्रमंडळींनी केले प्रा.बुंदेले यांच्या बासष्ठीचे आयोजन “

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.4ऑगस्ट):-समाजसेवक डॉ.गोविंद कासट मित्रमंडळींच्या वतीने दि .2 ऑगस्ट 2023 ला सर्वोदय कॉलनीतील संत रविदास महाराज सांस्कृतिक भवन येथे अभंगकार व समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांच्या बासष्ठीनिमित्त सत्कार सोहळा संपन्न झाला.

या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष माजी कुलगुरू स्व. डॉ.दिलीप मालखेडे यांचे वडील श्री नामदेवराव मालखेडे (सामाजिक कार्यकर्ते ), सत्कारमूर्ती प्रा.अरुण बुंदेले, प्रमुख अतिथी डॉ.गोविंद कासट, प्रा. डॉ. संजय खडसे,श्री निलेश जामठे (जिल्हाध्यक्ष,राष्ट्रीय चर्मकार महासंघ ),माजी एपीआय श्री भगवान बुंदेले, प्रा. डॉ.अजय खडसे ( सुप्रसिद्ध विद्रोही कवी व साहित्यिक) सुधाकर नासणे,श्री पांडुरंग खंडारे (अध्यक्ष,संत रविदास महाराज बचत गट) होते.

अध्यक्ष,सत्कारमूर्ती व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज,माजी कुलगुरू स्व. डॉ.दिलीप मालखेडे,आदर्श नगरसेवक कै.बाबारावजी बुंदेले, समाजसेविका कै.मैनाबाई बुंदेले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रा.अरुण बुंदेले यांचे थोरले बंधू माजी एपीआय श्री भगवान बुंदेले व सौ. गोकुळाताई बुंदेले (वहिनी)यांनी बासष्ठीनिमित्त औक्षण करून शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन अभिष्टचिंतन केले व पुढील कार्यासाठी आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.

समाजप्रबोधनकर्ते व साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले यांचा बासष्ठीनिमित्त डॉ.गोविंद कासट मित्र मंडळी,संत रविदास जीवन विकास बहुउद्देशीय संस्था, तथागत बुद्धभूमी संस्था,संत रविदास महाराज बहुउद्देशीय संस्था, उपेक्षित समाज महासंघ, संत रविदास महाराज बचत गट या संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी शाल, पुष्पगुच्छ पुस्तक व भेटवस्तू देऊन भावपूर्ण सत्कार केला.

कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे प्रा.अरुण बुंदेले यांनी बासष्ठीनिमित्त समाजसेवक डॉ. गोविंद कासट, प्रा.डॉ.संजय खडसे (सुप्रसिद्ध विद्रोही कवी, साहित्यिक ), सौ स्नेहल राजू विरुळकर ( शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार -2022 प्राप्त), श्री अनिल भागवतकर (अध्यक्ष, श्री संत रविदास महाराज जीवन विकास बहुउद्देशीय संस्था),श्री निलेश जामठे (जिल्हाध्यक्ष,राष्ट्रीय चर्मकार महासंघ),श्री नामदेवराव मालखेडे व सौ.वेणुताई मालखेडे, माजी एपीआय श्री भगवान बुंदेले व सौ.गोकुळाताई बुंदेले, डॉ. रंजना बनारसे व डॉ. राजू बनारसे (वैद्यकीय समाजसेवक), प्रा.नीलिमा राजिव पाटील (प्रसिद्ध आर्टिस्ट्स),श्री पांडुरंग खंडारे (अध्यक्ष,संत रविदास महाराज बचतगट), प्राचार्य श्री टी.एफ.दहिवाडे (अध्यक्ष तथागत बुद्धभूमी संस्था), श्री सुधाकर नासणे (अध्यक्ष, सर्वोदय कॉलनी मगासवर्गीय सोसायटी) व सौ.कांताबाई नासणे,श्री नरेंद्र गणोरकर ( सचिव, सर्वोदय कॉलनी मागासवर्गीय सोसायटी) यांचा पुष्पगुच्छ,शाल,प्रा.बुंदेले लिखित ” अभंग तरंग ” व ” निखारा ” हे काव्यसंग्रह व डॉ.गोविंद कासट लिखित “फोटोग्राफर विवेक सहस्रबुद्धे यांचे संघर्षशील जीवन ” ही पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.

प्रमुख अतिथी डॉ.गोविंद कासट यांनी ,” प्रा.बुंदेले यांनी स्वतःच्या वाढदिवशी सोळा विविध क्षेत्रातील मान्यवरांचे केलेले सत्कार केले,मनाला स्पर्शून गेले. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील कार्य अनमोल आहे.विद्यार्थी प्रबोधना सोबतच समाजप्रबोधनाचे त्यांचे कार्यही सतत सुरू असते.तीस वर्षापासून विविध प्रबोधनमालांचे सादरीकरण करणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.” —-
*प्रा.बुंदेले वास्तववादी साहित्यातून समाजप्रबोधन करणारे साहित्यिक -डॉ.संजय खडसे*
प्रमुख अतिथी प्रा.डॉ. संजय खडसे यांनी,” प्रा.बुंदेले हे वास्तववादी साहित्यातून समाज प्रबोधन करतात.त्यांचे काव्य संग्रह,एकांकिका व शैक्षणिक पुस्तके प्रबोधनात्मक असून वाचनीय आहेत.आज 62 व्या वर्षीही त्यांचे समाजप्रबोधनात्मक व शैक्षणिक कार्य सुरूच आहे.” असे विचार व्यक्त केले.

*विद्यार्थी जीवनातील जिद्द व चिकाटी अरुणमध्ये आजही कायम-मा. एपीआय श्री भगवान बुंदेले*
प्रमुख अतिथी माजी एपीआय श्री भगवान बुंदेले यांनी,” माझा धाकटा बंधू प्रा.अरुण आज कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान द्वारे जे सामाजिक व शैक्षणिक कार्य करीत आहे ते वाखाणण्यासारखे आहे.विद्यार्थी जीवनातील त्याची जिद्द व चिकाटी आजही कायम आहे.”

*वाढदिवशी प्रा.बुंदेले यांनी मान्यवरांचा केलेला सत्कार प्रेरक -नामदेवराव मालखेडे*
अध्यक्षीय भाषणातून श्री नामदेवराव मालखेडे यांनी,
” 62 व्या वाढदिवसानिमित्त प्रा. बुंदेले यांनी विविध क्षेत्रातील केलेला मान्यवरांचा सत्कार प्रेरणादायी आहे कारण सत्कार हे पुढील कार्याची प्रेरणा देत असतात.भविष्यात त्यांच्या विविध कार्याला गती मिळो ही सदिच्छा.” असे विचार व्यक्त केले.

*प्रा.बुंदेलें मध्ये ६२ व्या वर्षीही तरुणांना लाजविणारी धडपड-प्राचार्य श्री दहिवाडे*
प्रमुख अतिथी प्राचार्य श्री टी.एफ.दहिवाडे यांनी,”प्रा.बुंदेले सर यांची सामाजिक,शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील काम करण्याची धडपड आजही तरुणांना लाजविणारी आहे. या कार्यासाठी त्यांना उदंड
आयुष्याच्या शुभेच्छा.”असे विचार व्यक केले — *प्रा.बुंदेले समाजभूषण व्यक्तिमत्त्व-निलेश जामठे*
प्रमुख अतिथी श्री निलेश जामठे यांनी, ” प्रा.बुंदेले सर हे समाजभूषण व्यक्तिमत्त्व असून सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे कार्य वेगाने सुरूच आहे.” असे विचार व्यक्त केले.

*वधू-वर परिचय मेळाव्याला प्रा.बुंदेले यांचे मोलाचे सहकार्य-अनिल भागवतकर*
प्रमुख अतिथी श्री अनिल भागवतकर यांनी ,” श्री संत रविदास बहुउद्देशीय जीवन विकास संस्थेच्या माध्यमातून घेतलेल्या वधुवर परिचय मेळाव्यासोबतच थोरांच्या जयंती पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा.बुंदेले यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे. त्यांच्या वाढदिवशी पुढील कार्यासाठी सरांना संस्थेतर्फे शुभेच्छा.”असे विचार व्यक्त केले. –
*आजचा वाढदिवस माझ्या स्मरणयात्रेतील गोड क्षण- प्रा.अरुण बुंदेले*
सत्कारमूर्ती प्रा.अरुण बुंदेले यांनी आपल्या मनोगतात सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.आजचा वाढदिवस हा माझ्या स्मरणयात्रेतील गोड क्षण आहे.आपणा सर्वांमुळे मला पुढील कार्य करण्याची उर्जा मिळणार असल्याचे सांगितले.”

याप्रसंगी कुलगुरू स्व. डॉ. दिलीप मालखेडे वाचनालयाला प्रा. अरुण बुंदेले यांनी वाढदिवसानिमित्त ७५ पुस्तके व मासिके आणि डॉ.गोविंद कासट यांनी ४० पुस्तके भेट दिली.
कार्यक्रमाचे संचालन श्री नरेंद्र गणोरकर तर आभार श्री राजेंद्र पचागडे यांनी मानले.
कार्यक्रमाला सर्वश्री रमेश भटकर, कृष्णा मोहोकर,विवेक सहस्रबुद्धे,उमेश वैद्य,संजय खंडारे, सुनिल खंडारे आणि विविध संघटनांचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here