Home यवतमाळ नुकसानग्रस्त शेतकरींना तात्काळ मदत करा (अन्यथा जिजाऊ ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा)

नुकसानग्रस्त शेतकरींना तात्काळ मदत करा (अन्यथा जिजाऊ ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा)

44

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड :- (दि. 4 ऑगस्ट) यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची भरपाई देणे व विनाशर्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000/- रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, घराची पडझड झालेल्या नागरीकांना तात्काळ 10,000 रुपयांची सानुग्रह मदत देण्यात यावी.

अशी मागणी जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र कृषी मंत्री महाराष्ट्र पालक मंत्री यवतमाळ
जिल्हा कृषी अधिकारी यवतमाळ
यांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्ट पावसामुळे पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे.
मागील वर्षी विमा कंपण्यांनी पंचनाम्याची टाळाटाळ करून विमा देण्यास नाकारले याची पुनरावृत्ती होऊ नये.

जिल्ह्यात लाखो शेतकन्यांच्या पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले उत्सून प्रत्येक शेतकऱ्यांचे व्यक्तीक पिकाचे नुकसानीचे पंचनामे विमा कंपनीस सध्यातरी होणार नाही. याला फार वेळ लागेल त्यामुळे गावातील मंडळातील शेतकन्यांच्या एकत्रीत पिकांच्या नुकसानीचा सरसकट अहवाल तयार करुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई विमा कंपनीने त्वरीत द्यावी सोबत सरकार ने आपती व्यवस्थापन म्हणून शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 50 हजार तत्काळ मदत द्यावी. विमा कंपनीने पंचनाम्याच्या नावाखाली चालढकलपणा करु नये.

शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पिकाचा जोखीम हप्ता भरला असून त्यांचा हक्काचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे अन्यथा शेतकरी बांधव विमा कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करतील.

मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करुन आर्थिक मदत जाहीर करावी जिल्हा प्रशासनाने या बाबत ठोस भुमिका घेवून कंपनीला आदेश द्यावेत अन्यथा जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागेल. तसेच घराची पडझड झालेल्या नागरिकांना 10 हजार रुपये सानुग्रह मदत देण्यात यावी.

आपण या बाबीचा गांभीर्याने विचार करून तात्काळ कार्यवाही करून सर्व शेतकन्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी.

अन्यथा यवतमाळ जिल्हा जिजाऊ ब्रिगेड तीव्र आंदोलन छेडेल. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील.

असा इशारा जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here