




🔹नोकरीवर असुनही होता पैशाचा मोह-अशा लुटारुंचा आहे शहरात धुमाकूळ
✒️चक्रधर मेश्राम(विशेष प्रतिनिधी)मो:-9623459632
गडचिरोली(दि.2ऑगस्ट):-जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अनेक कर्मचारी, अधिकारी यांना माहिती अधिकार कायदान्वये माहिती मागुन ब्लॅकमेलिंग करून आणि धमक्या देऊन लाखो रुपयांची अपसंपदा जमा करण्यासाठी अनेकांना लुटले आहे. अशा प्रकारची तक्रार असल्याने आता अशोक लांजेवार चौकशीच्या जाळ्यात अडकणार असल्याची शहरात चर्चा सुरू आहे.
आतापर्यंत त्यांनी माहिती मिळावी यासाठी अनेक वर्षांपासून विविध शासकीय कार्यालयात माहिती अधिकारानुसार माहिती मागुन ब्लॅकमेलिंग करण्यात अग्रेसर असल्याची खमंग चर्चा ऐकायला मिळत आहे.
अशोक लांजेवार हे विश्वशांती महाविद्यालय कुनघाडा येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून अनेक कंत्राटदार, अधिकारी, आणि कर्मचाऱ्यांना लुटले आहे. अशोक लांजेवार चौकशीच्या जाळ्यात अडकल्या जाणार असल्याने खुशीने वातावरण निर्माण झाले आहे. (या वृतांबाबत सविस्तर माहिती करीता चक्रधर मेश्राम यांच्यासोबतच संपर्क साधावा-संपादक)

