सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.27जुलै):-शिवसेना प्रणित युवासेना चिमूर तालुक्याच्या वतीने वर्ग दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार शिल्ड व पुस्तके वाटून करण्यात आला.
युवासेना प्रमुख आदित्य उद्धवसाहेब ठाकरे यांचे आदेशानुसार शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे, युवा सेना जिल्हा प्रमुख मनीष जेठाणी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते यांचे मार्गद्शनाखाली शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांचे नेतृत्वात चिमूर येथील दहावी बारावी पास गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने पुस्तके व स्मृत्ती चिन्ह वाटप करण्यात आले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरिता चिमूर तालुका शिवसेना व युवा सेनाच्या वतीने शुभेच्या देण्यात आल्या.यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक तानाजी सहारे, निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर नीवटे, उपतालुका प्रमुख किशोर उकुंडे, संजय वांकडे, युवासेना तालुका प्रमुख शार्दुल पचारे, समीर बल्की, समीर आडे,उपस्थित होते




