Home महाराष्ट्र ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट 50 हजाराची मदत जाहीर करा-वंचित बहुजन...

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट 50 हजाराची मदत जाहीर करा-वंचित बहुजन आघाडीची मागणी

92

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 26 जुलै):-उमरखेड तालुक्यात 20 व 21 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील प्रत्येक गावातील सर्वच शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, कापूस, सोयाबीन,ऊस,हळद,मूग, उडीद, तीळ, तुर, या सह फळांच्या पिकाचे सुद्धा प्रचंड नुकसान झाले आहे.

बहुतांश शेतकऱ्यांना यावर्षी दुबार पेरणी सुद्धा करावी लागली यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी उमरखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने कुठलेही पंचनामे न करता सर्व शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी डॉ, व्यंकट राठोड यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे,तसेच निवेदनात शेतकऱ्यांनी यावर्षी घेतलेले बँकेचे, सोसायटीचे कर्ज राज्य सरकारने पूर्णपणे माफ करावं.

अतिवृष्टीमुळे घरात पाणी घुसून घराची नुकसान झालेल्यांना तात्काळ आर्थिक मदत देऊन नुकसान ग्रस्त घरांची दुरुस्ती करून द्यावी, उमरखेड तालुक्यातील नाल्यांचे खोलीकरण रुंदीकरण करण्यात यावं.

उमरखेड तालुक्यातील कमी उंची असलेल्या गांजेगाव पैनगंगा नदीवरील पूल, ढाणकी ते खरुस नाल्यावरील पूल, ढानकी ते बिटरगाव नाल्यावरील पूल, कुरळी येथील पुलांची उंची वाढवण्यात यावी.

अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जॉन्टी विणकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख संतोष जोगदंड, तालुका महासचिव देवानंद पाईकराव यांचे नेतृत्वात अर्जुन बर्डे, चंद्रमणी सावते, विष्णुकांत वाडेकर, सचिन वावळे, सुधाकर कदम, प्रतीक धोंगडे, भीम टायगर सेनेचे शाम धुळे, पत्रकार सिद्धार्थ दिवेकर, कैलास कदम, गंगाराम दवणे, पांडुरंग डुकरे, पुंडलिक शेंबडे, नागेश पाटील, रमेश डुकरे, रंजीत काळबांडे, माधव कवडे, यांनी निवेदनाद्वारे केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here