Home पुणे ‘शरद पवार आणि चंद्रपूर’ या विषयावर माहिती पाठविण्याचे आवाहन

‘शरद पवार आणि चंद्रपूर’ या विषयावर माहिती पाठविण्याचे आवाहन

146

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या जीवनावर आधारित ग्रंथाचे ५ खंड प्रकाशित होणार आहेत. त्यापैकी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांवर आधारलेल्या ‘शरद पवार आणि महाराष्ट्र- भाग १’ या पहिल्या खंडाचे प्रकाशन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते २७ फेब्रुवारी २०२३ रोजी पुण्यातील बाल गंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात झाले. या पुस्तकातून शरद पवारांची राजकीय कारकीर्द व त्यांच्या जीवनप्रवाहाचा आढावा घेण्यात आलेला आहे.

ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे हे पुस्तकाचे संपादक; तर सुरेश इंगळे हे प्रकल्प संपादक आहेत. राज्यातील प्रत्येक विभागांतील जिल्ह्यांमध्ये शरद पवार यांनी दिलेल्या योगदानाचा आणि त्या जिल्ह्यांशी असलेल्या त्यांच्या नात्याचा आढावा घेण्यात येणार आहे. ‘शरद पवार आणि चंद्रपूर’ या विषयाची जबाबदारी चंद्रपूरचे अभ्यासू युवा पत्रकार राजेश मडावी यांच्याकडे ‘सोपविण्यात आली. या लेखन प्रकल्पाला आपण संदर्भासहीत वस्तुनिष्ठ माहिती पुरवून सहकार्य करावे,

▪️संपर्क- राजेश मडावी(मो:-9665019210)

✒️सुरेश इंगळे(प्रकल्प संपादक व प्रकाशक ‘शरद पवार आणि महाराष्ट्र’ संचालक, स्ट्रॅटेजी कॉर्पोरेशन, पूणे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here