Home बीड धक्कादायक! बीडमध्ये बँकेवर दरोडा, लाखो रुपयांवर चोरट्यांचा डल्ला

धक्कादायक! बीडमध्ये बँकेवर दरोडा, लाखो रुपयांवर चोरट्यांचा डल्ला

107

 

बीड जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ आडे,9075913114

नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर काल (शनिवार) रात्री दरोडा पडला. रात्रीच्या सुमारास बँकेच्या पाठीमागून लोखंडी खिडकीतून दरोडेखोरांनी प्रवेश केला. गॅस कटरच्या सहाय्याने लोखंडी तिजोरी कापून तब्बल 12 लाख रुपयांवर डल्ला मारल्‍याची घटना घडली. या प्रकरणी नेकनूर पोलीस अधिक तपास करीत आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा सुरू आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

रविवार मध्यरात्री बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील अहमदपूर-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील लिंबागणेश महाराष्ट्र ग्रामीण बँकेत धाडसी चोरी झाली. सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत तसेच नेकनुर पोलिस स्टेशनचे सपोनि शेख मुस्तफा, उपनिरीक्षक विलास जाधव, उपनिरीक्षक अजय पानपाटील, लिंबागणेश पोलिस स्टेशनचे पो.ह.सचिन डिडुळ, नवनाथ मुंडे घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, ठसेतज्ञ, श्वानपथक टीम दाखल झाली असुन, स्थळ पंचनामा करण्यात आला असून, या घटनेचा तपास सुरू आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, मध्यरात्री लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पाठीमागील बाजुने लोखंडी शिडीवरून चढून चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने लोखंडी खिडकीचे गज तोंडुन आत प्रवेश केला व स्ट्राँगरूम कटरने फोडुन बँक मॅनेजर प्रणव कापसे यांच्या म्हणण्यानुसार अंदाजे साडेबारा लाख रोख रक्कम व काही सोने चोरीला गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here