




✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड :- (दि. 11 जून) येथील नगरपरिषद उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापकावर शालेय पोषण आहारात गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले.
शिक्षण विभागाच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
समीर अहेमद शेख मुतुर्जा असे निलंबित मुख्याध्यापकाचे नाव आहे.
नगरपरिषद उर्दु शाळेमधील शालेय पोषण आहारात
गैरप्रकार झाल्याचे पुढे आले होते.
त्या पार्श्वभुमीवर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती.
या समितीने आपली चौकशी पूर्ण करून अहवाल सादर केला. त्यामध्ये मुख्याध्यापकावर कर्तव्यात कसुर करून शालेय व्यवहाराकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला.
शालेय पोषण आहाराची जबाबदारी व्यवस्थित पार न पाडल्यामुळे मुख्याध्यापकास दोषी ठरवून दिले आहे.
निलंबित करण्यात आले आहे. समीर अहेमद शेख मुतुर्जा यांनी आपला मुख्याध्यापक पदाचा प्रभार सायकासिमी शेख वसिम अहेमद यांचेकडे द्यावा, असेही अहवालात नमूद आहे.
निलंबनाच्या काळात त्यांचे मुख्यालय नगर परिषद उर्दू माध्यमिक कन्या शाळा उमरखेड राहील, समीर अहेमद शेख मुतुर्जा यांनी दररोज शाळेमध्ये उपस्थित राहुन सहा.
शिक्षकाचे काम पाहावे असे आदेश गट शिक्षणाधिकारी यांनी अहवालातून दिले आहे.

