Home अमरावती भारतीय जनता पक्षाच्या उपोषणाला यश आमदार दादाराव केचे व मुख्याधिकारी शहा...

भारतीय जनता पक्षाच्या उपोषणाला यश आमदार दादाराव केचे व मुख्याधिकारी शहा यांच्या मध्यस्थीने उपोषणाची सांगता.

64

 

कारंजा घाडगे/प्रतिनिधी

कारंजा (घा): -कारंजा नगरपंचायत प्रशासन व काँग्रेस पदाधिकारी यांच्या विरोधात ५ जुन पासुन सुरू झालेल्या आमरण उपोषणाची सांगता आमदार दादाराव केचे व मुख्याधिकारी शहा यांच्या मध्यस्थीने २ तासाच्या चर्चेनंतर लिखित आश्वासन देऊन झाली. कारंजा शहरा करिता कचरा गाडी उपलब्ध करणे तसेच घनकचरा व्यवस्थापन केंद्रमधील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष दिलीप जसुतकर यांनी जिल्हाधिकारी मार्फत नगरपंचायत प्रशासन पदाधिकारी यांना 17 मे रोजी पत्र दिले होते. 30 मे पर्यंत मागण्या पूर्ण न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा पत्रकामध्ये देण्यात आला होता.दिनांक १ जुलै रोजी या संदर्भात नगरपंचायत प्रशासन पदाधिकारी यांना पत्र देऊन ५ जून पासून भाजपा शहर अध्यक्ष दिलीप जसुतकर, कारंजा तालुका सरचिटणीस राणा सिंग बावरी, व युवा मोर्चा शहराध्यक्ष वेदांत घीमे हे आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले होते. आमरण उपोषणाला सुरुवात होताच प्रशासनाला जाग आली. सकाळी ११ वाजता पासून सुरु झालेल्या आमरण उपोषणाला सर्व स्तरावरून चांगला प्रतिसाद मिळत होता.. भाजपा नगरसेवक रमा दुर्गे, वैशाली सरोदे, रंजना ढबाले,राहुल झोरे, हेमराज भांगे, उषा चव्हाण, योगिता कदम, सुवर्णा कावडकर, यांनी दिवसभर उपोषणाला उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.त्याचप्रमाणे उपोषणकर्त्यांच्या मागण्या योग्य असल्याने व कारंजा शहराच्या हिताच्या असल्याने भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तालुका अध्यक्ष मुकुंदराव बारंगे, कारंजा शहराचे नेते किशोर भांगे,हरिभाऊ धोटे, गौरीशंकर अग्रवाल,राजू काळबांडे, राजू डोंगरे ,राजू वंजारी, शैलेश घिमे, युवा मोर्चा वर्धा जिल्हा चिटणीस हेमंत धारपुरे, सुनील वंजारी, मुन्ना अग्रवाल, चक्रधर डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य सुरेश खवशी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दिनेश ढोबाळे ,सुधाकर दुर्गे, सुरेंद्र यावले, अजय भोकरे, शरद बोके, मुकेश टुले, निलेश मस्की, ताराचंद चाफले,संतोष काकडे ,शंकरराव कालभुत, प्रमोद चव्हाण, प्रवीण ढबाले, संजय कदम ,प्रकाश नारीगे, मनोज चापले, अनिस मुल्ला सर, राहुल नायर, शंकरराव बारंगे, सुजित चौधरी, संजय बागडे,रामभाऊ प्रांजळे , स्वप्निल वाडीभस्मे, सुदीप भांगे, कैलास अग्रवाल यांच्या सह कारंजा शहरातील अनेक नागरिकांनी उपोषणाला भेट देवुन आपला जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले..,तसेच काँग्रेसचे नगरसेवक तथा क्रीडा व शिक्षण सभापती हेमंत बन्नगरे, व माजी नगरसेवक गजू चाफले यांनी उपोषण मंडपाला भेट दिली..
कारंजा नगरपंचायत चे मुख्याधिकारी शहा, इंजिनियर कुंभरे, साळुंखे यांनी इतर कर्मचाऱ्यांना सोबत घेवून उपोषण मंडपाला भेट दिली. उपोषणकर्त्यांच्या समस्या जाणून घेत असताना आर्वी विधानसभेचे आमदार दादाराव केचे उपोषण स्थळी पोहोचले. उपोषणकर्त्यांच्या मागण्या समजून घेतल्या,एकलव्य ट्रेडिंग कंपनी देवळी हे आपले काम व्यवस्थित करीत नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यानी केला. अधिकारी व पदाधिकारी हे कंपनीकडून व्यवस्थित काम करून घेण्यास अपयशी ठरत असल्याने यावेळी भाजपा नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांचे म्हणणे होते.. कचरा डेपो करिता कारंजा नगरपंचायतने २ एकर जागा जवळपास १ वर्षापूर्वी घेतली.. परंतु त्याजागेला ताराचे कुंपण व जाळी न बसवल्याने तिथे कचरा संकलन करू शकत नसल्याचे अधिकारी यांनी सांगीतले.आमदार दादाराव केचे यांनी क्षणाचाही विलंब न करता नवीन कचरा डेपोच्या तार व जाळीकरिता ३ लाख रुपयांचे पत्र दिले..१ वर्षे लोटूनहीनी जर कचरा डेपोचे नियोजन अधिकारी करू शकत नसेल, तर त्यांच्या कार्यप्रणालीवर शंका व्यक्त होत होती,जवळपास दोन तासाच्या दीर्घ चर्चेनंतर आठ दिवसांमध्ये कचरा गाडी उपलब्ध करून देऊ, तसेच नवीन कचरा डेपो लवकरात लवकर सुरू करून सध्याचा कचरा डेपोतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येईल,असे लिखित आश्वासन नगरपंचायत मुख्याधिकारी शाहा यांनी दिल्यानंतर ,आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते उपोषण करते दिलीप जसुतकर, राणा बावरी, वेदांत घिमे यांना सरबत पाजून उपोषणाची सांगता केली. कारंजा शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त असणाऱ्या मागण्याकरिता आमरण उपोषणाचा घेतलेला पवित्रा व त्यामधून मिळालेले यश, याकरिता भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.कारंजा नगरपंचायत मध्ये काँग्रेसची सत्ता असून एक सक्षम विरोधक म्हणून भाजपा काम करत असल्याचे चित्र या माध्यमातून दिसून आले.आमदार दादाराव केचे व मुख्याधिकारी शहा यांनी उपोषण मंडपाला भेट देवून उपोषण कार्त्यांच्या मागणीवर तोडगा काढल्याबद्दल उपस्थीत सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here