
✒️(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि.7 जून) बोंढार हवेली तालुका जिल्हा नांदेड येथील अक्षय भालेराव या बौद्ध तरुणाची निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी..! अशी मागणी भिम टायगर सेना सामाजिक संघटना उमरखेड तर्फे उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय उमरखेड जिल्हा यवतमाळ यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदना देण्यात आले.
बोंढार येथील भीमसैनिक अक्षय भालेराव यांनी गावामध्ये भीम जयंती का काढली या कारणाने त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.
—————-
– संविधानाची निर्मिती भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भीम जयंती काढणे या देशात गुन्हा होत चाललेला आहे..!
ही मानसिकता कुठेतरी थांबली पाहिजे…!
जातीवादी गावगुंडांनी निर्घृण हत्या घडवून आणली व तसेच गावातील बौद्ध वस्तीवर दगडफेक केली या प्रकरणातील सर्व आरोपीवर कठोर कार्यवाही करून पीडित कुटुंबाला न्याय देण्यात यावा तसेच अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयास तातडीने 50 लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात यावी, निर्घृण हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून 6 महिन्यात निकाल देण्यात यावा तसेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अक्षय भालेराव कुटुंबातील एकास तात्काळ शासकीय नोकरी देण्यात यावी,
अक्षय भालेराव यांच्या कुटुंबास कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्यात यावे.
इत्यादी मागण्यांचे निवेदन सामाजिक संघटना भीम टायगर सेना उमरखेड शाखेच्या वतीने देण्यात आले.
यावेळी पत्रकार सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भिम टायगर सेना उमरखेड), कैलास कदम (तालुका अध्यक्ष भिम टायगर सेना उमरखेड), लीलाबाई हाटकर (तालुका अध्यक्ष भिम टायगर सेना महिला आघाडी), संबोधी गायकवाड (सभापती नप ढाणकी), संतोष जोगदंडे (तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी), देवानंद पाईकराव (तालुका महासचिव वंचित बहुजन आघाडी), प्रफुल दिवेकर, बबलू भालेराव, शुद्धोधन दिवेकर (शहराध्यक्ष रिपब्लिकन युवा सेना उमरखेड) इत्यादी अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
