Home गडचिरोली दापोरी जिल्हा परिषद शाळेमध्ये माता पालक गटाची सभा संपन्न !

दापोरी जिल्हा परिषद शाळेमध्ये माता पालक गटाची सभा संपन्न !

51

 

( मोर्शी तालुका प्रतिनिधी )
महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांन करिता शाळा पूर्व तयारी हा महत्वाकांशी उपक्रम सुरू केला आहे .त्याअंतर्गत जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा दापोरी येथे माता पालक गटाची महत्त्वाची सभा घेण्यात आली. सभेला एकूण चार माता पालक गटाचे प्रमुख हजर होते. शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष सौ अंकिता विघे, ग्राम प सदस्य रुपेश वाळके, मुख्याध्यापक श्री गजानन चौधरी, विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या मुलांचे पालक, विषय तज्ञ कुश कुमार पाथरे हजर होते. यावेळी सर्व पालकांना शाळा पूर्व तयारी चे महत्त्व, आणि प्रत्येक मुलांचा प्रगती चा आढावा घेण्यात आला. मे महिन्यात घेण्यात आलेल्या चार आठवड्याचा सकारात्मक अहवाल घेऊन समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी कुश पाथरे यांनी मुलांनी किती होमवर्क केले आणि त्यानुसार प्रत्येक पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी, शिक्षणा बद्दल आवड निर्माण करणे, शाळा सुरू होण्यापूर्वी उजळणी करणे, पालकांनी मुलांना वेळ काढून अभ्यास घेणे हा उद्देश ह्या उपक्रमाचा आहे असे मुख्याध्यापक गजानन चौधरी यावेळी म्हणाले. सर्व पालकांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी साथ दिली त्या बद्दल मुख्याध्यापकांनी सर पालकांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here