Home महाराष्ट्र जागतिक पर्यावरण दिनी गुणवंतांचा गुणगौरव !.. कर्तव्य बहुउद्देशीय संस्था व सुधाकर...

जागतिक पर्यावरण दिनी गुणवंतांचा गुणगौरव !.. कर्तव्य बहुउद्देशीय संस्था व सुधाकर मोरे मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम !.. माणसाने जीवनात मोठ्या वृक्षासारखे खोलवर मूळागाडून जगले पाहिजे – प्रा.आर.एन.महाजन.

65

 

धरणगांव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर

धरणगांव – शहरातील जी एस नगर येथे ५ जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जी एस नगर धरणगाव येथील ओपनस्पेस मध्ये मा.मुख्याधिकारी जनार्दन पवार, स्वच्छता निरीक्षक रविंद्र गांगुर्डे, शहर समन्वयक निलेश वाणी, मुकादम अण्णा महाजन, शेख समसुद्दीन,रामकृष्ण महाजन व नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी यांनी ग्राऊंड ची सफाई करून खड्डे खोदून वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षाची लागवड केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. आर.एन.महाजन होते. प्रमुख अतिथी म्हणून प.रा.विद्यालयाचे सचिव डॉ.मिलिंद डहाळे, दै.दिव्यमराठी पत्रकार बी आर महाजन,आदर्श शिक्षक कैलास पवार, माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही टी माळी,कु दिक्षा गायकवाड, डॉ.केतकी पाटील ( सचिव, गोदावरी फौंडेशन ) डॉ. रोहिणी शिंदे, शुभांगी पाटील आणि कर्तृत्व बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष सुनीलभाऊ चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
आलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांचा कर्तव्य बहुउद्देशीय संस्था व सुधाकर मोरे मित्र परिवाराच्या वतीने पुष्पगुच्छ व वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. चि.कौशिक मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचे वृक्षारोपण करून आणि गावातील SSC व HSC परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ,त्यांच्या पालकांना आणि गुरुजनांना ग्रंथ, वृक्ष व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. चि. कौशिक मोरे व सुनीलभाऊ चौधरी यांना जन्मदिनानिमित्त मान्यवरांनी वृक्ष व ग्रंथ भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
पर्यावरण संतुलनासाठी वृक्षाची लागवड व संवर्धन करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्रमुख अतिथी डॉ.मिलिंद डहाळे यांनी केले.यावेळी दै.दिव्यमराठी पत्रकार बी आर महाजन,आदर्श शिक्षक कैलास पवार, माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही टी माळी यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाचे कौतुक करून गुणवंतांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच जागतिक पर्यावरण दिनाच्या देखील सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आर.एन. महाजन यांनी विविध उदाहरण दाखले देऊन पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. माणसाने जीवनात मोठ्या वृक्षासारखे खोलवर मूळागाडून जगले पाहिजे. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे, शाळेचे व शहराचे नाव मोठे करावे आणि शिक्षण घेत असताना आपली संस्कृती व संस्कार विसरू नये.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील यांनी तर आभार सुनील चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन आदर्श शिक्षक , वृक्षमित्र, पर्यावरणप्रेमी सुधाकर मोरे आणि परिवार व कर्तव्य बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here