Home यवतमाळ रुग्णाचे हक्क राज्यस्तरिय अभिमान ला सुरवात एमपीजे राबविणार 1 ते 15...

रुग्णाचे हक्क राज्यस्तरिय अभिमान ला सुरवात एमपीजे राबविणार 1 ते 15 जुन पर्यंत अभियान (रुग्ण हक्का विषयी करण्यात येणार जन जागृती)

46

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड :- (दि. 5 जून)
आरोग्य हक्क मूलभूत अधिकार आहे . आरोग्य हक्क मानव अधिकाराचाच एक भाग आहे ‘ म्हणूनच भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत भारताच्या प्रत्येक नागरिकाला आरोग्याचा अधिकार मिळण्याची शास्वती मूलभूत परिपूर्ण हक्क आहे . जीवन फक्त स्वासोश्वास घेण्याचे शारीरिक प्रदर्शन नाही .म्हणून त्याच्या सुरक्षेसाठी ठोस प्रयत्न केले जाणे आवश्यक आहे . परंतु कोविड च्या काळात आपण पाहीले की आपली आरोग्य व्यवस्था किती सक्षम आहे ? या आजारी व्यवस्थेचा उपचार करणे गरज आहे . शासकीय रुग्नालयात डॉक्टर्स , स्टॉफ , औषधी , इंजेक्शन , ऑक्सीजन ची कमतरता खाजगी रुग्णालयात रुग्णांची आर्थिक लुट , मानसीक त्रास आपण पाहीले . याचे कारण नागरीकांना त्यांचे अधिकारी ची माहीती नसणे होय .

रुग्ण हक्काची नागरिकांना माहीती होऊन त्यांनी आपल्या हक्का साठी स्वतः जागृत होऊन ते प्राप्त करावे याउद्देशाने मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेल्फेअर ( एमपीजे )या नागरी हक्कासाठी प्रयत्नशिल सामाजिक संघटने तर्फे राज्यभर 1 जून ते 15 जून पर्यंत रुग्णांचे हक्क अभियान साजरा करण्यात येत आहे .

या अभिमाना अंतर्गत नागरी हक्का साठी कार्य संघटनांना सोबत घेवून काम करणे , त्याच्या सोबत सभा लावून अभियानाचे नियोजन करने , कॉर्नर मिटीग , घरोघरी भेटी , बॅनर , पॉम्पलेट , पथनाटय , प्रसार माध्यमे , जाहीर सभा आदी माध्यमातुन जन जागृती करण्याचा मानस आहे . या अभियाना चा शुभारंभ कार्यक्रम नागचौक येथील कार्यालयात संपन्न झाला.

यात स्थानिक व जिल्ह्यातील कार्याचे नियोजन करण्यात आले . कार्यक्रमात हाफीज अन्सार हुसेनी , डॉ . फारूक अबरार , मोहसीन राज , मिनाज अहेमद , समीर मुस्तफा , तसलीम अहेमद , फिरोज अन्सारी ,जहीर हामिद , गजानन भालेराव आदी कार्य कर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here