Home महाराष्ट्र आदर्शमाता प्रतिष्ठान आणि प्रवीण शिंदे (तात्या) मित्र परिवारातर्फे शालेय साहित्याची वाटप.

आदर्शमाता प्रतिष्ठान आणि प्रवीण शिंदे (तात्या) मित्र परिवारातर्फे शालेय साहित्याची वाटप.

56

 

कराड – पाडळी केसे तालुका कराड येथील सुपुत्र तिरंगा रक्षक, क्रांतिकारी जय भिम चे संपादक आणि आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्शमाता प्रतिष्ठान आणि प्रवीण शिंदे (तात्या) मित्रपरिवार, अंतवडी यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय साहित्याची वाटप करण्यात आले.
अंतवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच शितल सचिन शिंदे यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, यावेळी प्रवीण शिंदे( तात्या), अंतवडी ग्रामपंचायत सदस्य आनंदा शिंदे, विकास सेवा सोसायटीचे सदस्य सुरेश शिंदे (फौजी),आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, सतीश पोतदार, किरण शिंदे, सयाजी शिंदे,मधुकर शिंदे, आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आणि पाचवीचे ग्रामपंचायतीचे सदस्य आनंदा बडेकर, संपतराव मोहिते, विजयनगरचे सुपुत्र अरुण जाधव, परिसरातील ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here