Home महाराष्ट्र देवराव भोंगळे यांच्या पुढाकारातून भोई बांधवांसाठी मासेमारी करीता घुग्घुस शहरात नवीन तलावाची...

देवराव भोंगळे यांच्या पुढाकारातून भोई बांधवांसाठी मासेमारी करीता घुग्घुस शहरात नवीन तलावाची निर्मिती

60

पंकज रामटेके, विशेष प्रतिनिधी
घुग्घुस – शहरामध्ये मासेमारी करणाऱ्या भोई समाज बांधवांची संख्या खूप मोठी आहे. घुग्घुसमधील दोन्ही तलाव अपुरे पडत असल्यामुळे भोई समाज बांधवांसमोर उपजीविकेची मोठी समस्या निर्माण झाली होती.

रोजगारासाठी भोई समाज बांधव अनेक बाहेरील गावामध्ये मासेमारी करिता भटकत होते. ही समस्या घेऊन भोई समाज बांधवांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांची भेट घेतली. त्यानंतर लगेच जागेचा शोध घेण्यात आला. वेकोलिच्या पडीत जमिनीवर बांध बांधल्यास मोठ्या तलावाची निर्मिती होऊ शकते ही बाब भटकंती करतांना सर्वांना लक्षात आली.
लगेच देवराव भोंगळे यांनी वेकोलिचे महाप्रबंधक आभास सिंह यांच्याशी चर्चा केली. भोई समाज बांधवांच्या रोजगार निर्मितीसाठी तलावाची आवश्यकता त्यांनी वेकोलिचे महाप्रबंधक आभास सिंह यांना पटवून दिली.

वेकोलिचे महाप्रबंधक आभास सिंह यांनी वेकोलितर्फे तत्काळ मशीन उपलब्ध करून दिली. भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात व वेकोलिचे महाप्रबंधक आभास सिंह यांच्या सहकार्याने मच्छीपालनासाठी ११ एकरच्या तलावाची निर्मिती करण्यात आली.
या तलावाच्या निर्मितीतून घुग्घुसच्या ढीवर समाज बांधवांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. त्या अनुषंगाने ढीवर समाजातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे प्रविण सौदारी,राजेश मोरपाका,भोई समाजाचे सतीश कामतवार, मारोती बोरवार, मंगेश नागपुरे, किरण कामतवार, अंकुश कामतवार, संतोष कामतवार, शंकर कामतवार, रवींद्र कामतवार, शंकर कार्लेकर, रवींद्र पचारे, संदीप कामतवार, रामदास दिघोरे, वसंता कामतवार, बंडू शिवरकर व सुनील मांढरे व समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here