Home महाराष्ट्र अहिल्याबाईंनी प्रशासनही लोकाभिमुख केले होते – आ. डॉ. गुट्टे

अहिल्याबाईंनी प्रशासनही लोकाभिमुख केले होते – आ. डॉ. गुट्टे

58

गंगाखेड (अनिल साळवे, प्रतिनिधी) :-
गंगाखेड – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या २८ वर्षांच्या कार्यकाळात प्रजेला सर्वस्व मानून लोकाभिमुख राज्यकारभार केला होता.‌ लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतले व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुध्दा केली. त्यामुळे जगाच्या इतिहासात पराक्रम योध्दा म्हणून त्यांची नोंद आहे. त्यांची प्रशासकीय व्यवस्था सुध्दा वाखण्याजोगी होती. प्रत्येक गोष्टींवर त्यांचे लक्ष होते.‌ त्यामुळे अहिल्याबाईंनी प्रशासन लोकाभिमुख केले होते, गौरोद्वार गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी काढले.
पालम येथे आयोजित अहिल्याबाई होळकर जंयती सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.‌ याप्रसंगी अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, अहिल्याबाई होळकर यांनी सत्तेची मक्तेदारी मोडून उल्लेखनीय राज्यकारभार केला. अनेक धोरणे व मोहिमा यशस्वी करून आपली चुणूक दाखवून दिली आहे. दुःख बाजूला सारून लोकहिताची भूमिका घेवून वाटचाल केली. त्यामुळे त्यांचे विचार, धोरणे व कार्य आजही दीपस्तंभ आहे. त्यांनी केलेली लोकोपयोगी कामे नेहमी दिशा देतात.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती पै.मारोतराव बनसोडे, नगराध्यक्ष वसंतराव सिरसकर, रासपचे प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव दादा रोकडे, जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप आळनुरे, तालुका प्रभारी माधवराव गायकवाड, तालुकाध्यक्ष बालासाहेब रोकडे, जयंती उत्सवाचे स्वागताध्यक्ष माजी सभापती गणेशराव घोरपडे, नगरसेवक माउली घोरपडे, माजी जि.प.सदस्य शंकरराव वाघमारे, डाॅ.रामराव उंदरे, पै.गोकूळ लोखंडे, लक्ष्मणराव रोकडे, नगरसेवक भास्करराव सिरस्कर, विजय घोरपडे, नगरसवेक जालिंदर हत्तीअंबीरे, संचालक गणेश हत्तीअंबीरे, राहूल शिंदे, जयंती उत्सव अध्यक्ष गणेश शेंगुळे, कोषाध्यक्ष गोविंद घोरपडे यांच्यासह सर्व सदस्य, पदधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here