



सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100
म्हसवड : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात येणारा २०२३-२४ चा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ पुरस्कार होळीचागाव, ता. खटाव, जि. सातारा या ग्रामपंचायतच्या वतीने सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल याच गावच्या राहिवाशी असलेल्या लीना अविनाश बारसिंग यांना प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी होळीच्यागावचे ग्रामविकास अधिकारी सुनील राजगुरू,माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब लादे,सरपंच वंदना शिंदे,उपसरपंच रणजीत शेटे,ग्रामपंचायत सदस्य प्रकाश खाडे, सुनिता चंद्रकांत देशमुख, सुनिता रामचंद्र देशमुख, स्नेहा साठे,उषा जगताप,अण्णा मोरे आदी उपस्थित होते.


