Home महाराष्ट्र भीमशक्ती तरुण मंडळाच्या वतीने बीजवडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात...

भीमशक्ती तरुण मंडळाच्या वतीने बीजवडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी !!

49

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100

म्हसवड : वंचित बहुजन आघाडीचे माण तालुका अध्यक्ष युवराज भोसले यांच्या मार्गदर्शनातून भीमशक्ती तरुण मंडळ बीजवडी व अहिल्यादेवी तरुण मंडळ यांच्या सहकार्याने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी एम डी दड्स सर यांनी अहिल्याबाई होळकर यांचा संघर्ष आपल्या भाषणातून मांडला यावेळी दडस म्हणाले अहिल्यादेवी यांच्या संघर्षाची दखल महात्मा ज्योतिबा फुले व राजश्री शाहू महाराज यांनी घेतली होती.भीमशक्ती तरुण मंडळाने महामानवाच्या जयंत्या साजऱ्या करून इतिहास घडविला आहे असे ते पुढे म्हणाले.
माण पंचायत समितीचे माजी सभापती व वंचित चे सल्लागार बाळासाहेब रणपिसे म्हणाले की “चारित्र्य,कर्तृत्व व नेतृत्व याचा आदर्श अहिल्याबाई यांचेकडून घ्यावा असे सांगून त्यांची कठोर व सर्वांना समान न्याय देण्याची पद्धत सांगताना आपल्या मुलाला मृत्यूदंडाची शिक्षा सूनवल्याचे उदाहरण सांगितले.कुशल प्रशासक ,लोकहिताचे निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करून रयतेला सुखी करणारी लोकमाता व राजकीय मुत्सद्देगिरी ने राज्य बळकविण्यास आलेल्या राघोबा पेशवे यांना युद्ध न करता परत जाण्यास भाग पाडले अशी उदाहरणे देऊन अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास सांगितला
प्रास्ताविक व आभार संतोष रणदिवे यांनी मानले .कार्यक्रमास रंगाशेठ भोसले,लाला पाटील,तानाजी वीरकर,तांबे सर,माजी सरपंच यशवंत गाढवे,दादा दंडस,पप्पू दडस, पप्पू वीरकर,दादासो शिनगारे,मधुकर भोसले,अनिल भोसले ,आनंदराव भोसले,सुभाष शिनगारे,विजय बरकडे,शंकप्पा बरकडे, पत्रकार जाधव ,राजवडीचे माजी सरपंच पोपट गोरवे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बापूराव सरतापे, सुनील भोसले,नितीन रणदिवे,प्रकाश रणदिवे,सागर भोसले,सुरज भोसले,विवेक भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले
कार्यक्रमास बहुजन महिलांची उपस्थिती लक्षणीय होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here