✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड:- (दि.28 मे) “कष्टाने बाई तिने नटविला संसार..! विकुनिया गौऱ्या लावी हातभार”…!
अशी माता रमाई म्हणजेच महामानव, क्रांतीसुर्य, बोधिसत्व, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धांगिनी रमाई भिमराव आंबेडकर यांच्या स्मृती दिना निमित्ताने सम्यक बुद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नव कोटी लेकरांची माय माऊली रमाई च्या प्रतिमेला उपस्थित सर्वच बौद्ध उपासक, उपासिका आणि तरुण मंडळी तर्फे पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
लगेच त्रिशरण पंचशील ग्रहण करून रमाई गीते गाऊन श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रफुल दिवेकर अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, पत्रकार सिद्धार्थ दिवेकर कोषाध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांनी केले होते.
यावेळी जिजाबाई .ब. दिवेकर हिराबाई दिवेकर, यशोदाबाई दिवेकर, सुभाद्राबाई पाईकराव, उषाताई इंगोले, यशोधरा धबाले, मारोती दिवेकर,जिजाबाई दिवेकर, जानकाबाई इंगोले, नरेंद्र गवंदे, सुजल केंद्रेकर इत्यादी अनेक समाज बांधव उपस्थित होते.