Home यवतमाळ शेतकऱ्यांनो निसर्गाला घाबरू नका-पंजाबराव डख

शेतकऱ्यांनो निसर्गाला घाबरू नका-पंजाबराव डख

25

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड : – (दि. 27 मे) शेतकऱ्यांनो निसर्गाला घाबरू नका निसर्गाच्या हालचालींची वेळोवेळी माहिती देऊन मी तुम्हाला सतर्क करेन , असे प्रतिपादन प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले.

उमरखेड येथील स्थानिक गो सी गावंडे महाविद्यालयात दि. 26 मे रोजी दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाच्या वतिने संपन्न झालेल्या शेतकरी मार्गदर्शन व चर्चासत्र या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाजाचे अध्यक्ष राम भाऊ देवसरकार होते तर स्वच्छता दूत माधवराव शेळगावकर यांचेसह आमदार नामदेवराव ससाने स्वागताध्यक्ष साहेबराव कांबळे माजी आमदार राजेंद्र नगर धने विजयराव खडसे काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस तातू जी देशमुख भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा काँग्रेस शहराध्यक्ष हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर ‘ नंदकिशोर अग्रवाल, डॉ. अंकुश देवसरकर एकनाथ पाटील जाधव प्रा पाटील नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाळासाहेब चंद्र पाटील खवी संघ अध्यक्ष विजय नरवाडे तहसीलदार आनंद देऊळगावकर ठाणेदार अमोल माळवे महिला शेतकरी लक्ष्मीबाई पारवेकर अविनाश खंदारे सह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते पुढे म्हणाले की, येत्या 10 दिवसात शेती मशागतीची कामे आटोपून घ्या, 8 जून रोजी मान्सुनचे जोरदार आगमन होणार आहे . भविष्यात यवतमाळ जिल्ह्यात दुष्काळ पडणार नाही असा विश्वास त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला . भविष्यात शेताच्या बाजूला चर खोदून पिकांचे संरक्षण करण्याची पाळी येईल.

शाळेत 8 वी मध्ये शिकत असतांना मी हवामान अंदाज वर्तविण्यास सुरुवात केली असे सांगून जि . प शाळेत अंशकालीन कर्मचारी होतो परतू अल्पशः पगारामुळे ती नोकरी सोडली व घरची 10 एकर शेती करण्यास सुरुवात केली त्यातील उत्पन्नाने मी समाधानी असल्याचे डख यांनी म्हटले आहे . भारत हा कृषी प्रधान देश आहे कोरोना काळात सर्व कंपन्या बंद पडल्या परंतु अन्न बनविणारी शेतकऱ्यांची शेती कंपनी सुरुच होती.

वृक्षतोडीमुळे जंगले नष्ट होत चालल्याने निसर्ग रुसलेला आहे . त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले . महाराष्ट्रातील जनतेला हवामान अंदाज सांगणे सोयीस्कर व्हावे यासाठी 250 व्हॉट्स अॅप गृप तयार करून शेतकऱ्यांना वेळोवेळी माहिती पुरविण्याचे काम सातत्याने सुरु असल्याचे त्यांनी सांगीतले.

त्यासह मुंबईच्या दिशेने आलेला पाऊस हा आपल्या भागात अल्प प्रमाणात पडतो तर पुर्वेकडुन आलेला पाऊस हा समाधानकारक पडतो, पावसाने दिशा बदलल्यामुळे यंदा समाधानकारक पावसाचे भाकित त्यांनी वर्तविले . पावसाच्या आगमनाची चाहुल लागण्याची लक्षणे त्यांनी यावेळी सांगीतली त्यात विमानाचा आवाज , उभे वारे वाहु लागणे, चिमण्या धुळीत घोळणे , चिंचेचा बहार , आंब्यांचा बहार , बिब्याच्या झाडांचा बहार , कडूलिंबांच्या लिंबोळीचा बहार ‘ जांभळीचा बहार , सुर्य उगवतानाची अवस्था, सुर्य मावळतांनाची अवस्था, ऑगस्ट महिन्यातील लाकडी दरवाजाचा आवाज अशी लक्षणे सोप्या भाषेत शेतकऱ्यांना त्यांनी समजाऊन सांगितली . तर गारपिट व विजेपासून संरक्षण कसे करावे ही महत्वपूर्ण माहिती त्यांनी उपस्थित हजारो शेतकन्यांपुढे विषद केली.

यावेळी शेतकरी नेते माधवराव पाटील शेळगावकर , आमदार नामदेव ससाणे, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष साहेबराव कांबळे यांनी अभ्यास पूर्ण मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक साहेबराव धात्रक यांनी केले तर सुत्रसंचलन बाळासाहेब ओझलवार यांनी तर आभार लक्ष्मीकांत नंदनवार यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे अध्यक्ष निळकंठ धोबे, कार्याध्यक्ष वसंत देशमुख , उपाध्यक्ष अंकुश पानपट्टे, प्रसिद्धीप्रमुख शैलेश ताजवे, कोषाध्यक्ष अजय कानडे ,प्रशांत भागवत , अझर उल्लाखान, अविनाश मुन्नरवार, डॉ. विशाल माने ‘ डॉ . शिवचरण हिंगमिरे ,सलमान अशहर खान, व्यंकटेश पेन्शनवार, रवि भोयर, सागर शेरे, संजय देशमुख, प्रा .डॉ प्रदिप इंगोले ‘ गजानन भारती ‘ ताहेर मिर्झा ‘अरुण बेले आदिंनी अथक परिश्रम घेतले.

Previous articleआ.ससाने यांच्या प्रयत्नातुन बंदी भागातील मजुरांच्या हाताला मिळाले काम
Next articleसम्यक बुद्ध विहारा मध्ये माता रमाईस विनम्र अभिवादन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here