



म्हसवड : थायलंड दूतावासाचे मिलिंद अहिवळे यांचा भारतीय परदेश सेवेचे जेष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.
एक मराठी व्यक्ती गुणवत्तेच्या जोरावर थायलंडच्या मोठ्या अधिकारीपदी पोहचणे ही आम्हा सर्वांसाठी गौरवाची बाब आहे, अशी कौतुकाची थाप ज्ञानेश्वर मुळे यांनी यावेळी दिली.
दिल्ली मध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी दिल्ली कस्टमचे प्रमुख प्रशांत रोकडे, मालदीव आणि श्रीलंका उच्चालयातील अनेक अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन स्वान फौंडेशन आणि सेडॉर चेंबर ऑफ कॉमर्स यूएसए आणि थायलंड, एमएसएमइ बिजनेस फोरम यांनी केले.


