



दिनांक 23 में 2023
खामगांव:- समाज सेवेत सदैव अग्रेसर असलेले एकनिष्ठा गौ-सेवा जनसेवा फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची दखल घेत प्रतिष्ठा न्युजच्या चौथ्या वर्धापन दिन रविवार दि. २१ मे २०२३ रोजी डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगलीवाडी (सांगली) येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा अयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मा. प्राचार्य डी. जी. कणसे सर, आयुक्त सुनिल पवार साहेब सांगली प्रतिष्ठा न्युज संपादक तानाजीराजे जाधव यांच्यासह मान्यवर होते सुरज यादव यांनी आता पर्यंत एकनिष्ठा फाउंडेशन तर्फे हजारोच्या वर गरीब रुग्ण लोकांना रक्ताची व तसेच आर्थिक मदत करून जिवनदान दिले या कार्याची दखल घेत सांगली येथे झिनदाबाद समाजरत्न पुरस्कार देऊन सम्मानित केले अशी माहिती गब्बू गुजरीवाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.


