



मुंबई-वंचित बहुजन आघाडी ईशान्य मुंबईच्या वतीने दिनांक२४ मे रोजी होणाऱ्या संविधानाच्या सन्मानार्थ जाहीर सभेचे आयोजन जनता मार्केट खडी मशीन भांडूप येथे करण्यात आलेले आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. त्यांची जाहीर सभा भव्यदिव्य झाली पाहिजे त्यासाठी महिला पदाधिकारी नगरा नगरातील घरोघरी जाऊन प्रचार प्रसार करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वंचित बहुजन महिला आघाडी भांडुप तालुकाच्या वतीने धावत दौरा आयोजित करण्यात आले असता चंद्रकला सागर तायडे यांच्या घरी ईशान्य मुंबई जिल्हा महिला अध्यक्ष शारदाताई गायकवाड यांनी धावती भेट दिली. त्यावेळी चंद्रकला सागर तायडे यांनी त्यांचे शाल देऊन व फुलांनी स्वागत करून सागर तायडे लिखित “क्रांतिकारी विचारांच्या सागर लाटा” हे पुस्तक भेट देण्यात आले, तसेच महिला पदाधिकाऱ्यांना सुनिता तायडे यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी भांडुप तालुका महिला अध्यक्ष अनिता कांबळेसह महिला पदाधिकारी अनिता भडांगे, तुळसाबाई इंगळे, सुनीता तायडे, चंद्रकला तायडे, विजया वानखडे, कोकिळाबाई बांगर यांची प्रमुख उपस्थित होती.


