Home चंद्रपूर घुग्घुस स्थित लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीद्वारे पर्यावरणीय मापदंडांच्या अधीन राहून...

घुग्घुस स्थित लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीद्वारे पर्यावरणीय मापदंडांच्या अधीन राहून वीज निर्मिती

60

पंकज रामटेके, विशेष प्रतिनिधी
घुग्घुस – लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी आपले अंतर्गत आणि आजूबाजूचे वातावरण स्वच्छ, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

कंपनीच्या पॉवर प्लांट विभागाचे सहाय्यक उपाध्यक्ष विनोद पांडे यांच्याशी चर्चा करताना ते म्हणाले की, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये स्पंज आयर्नच्या उत्पादनासह वीजनिर्मितीही केली जाते आणि ही प्रक्रिया ५ भट्ट्यांच्या माध्यमातून वेस्ट हीट रिकव्हरी बॉयलर (WHRB) द्वारे केली जाते. भट्टींमध्ये निर्माण होणारी उष्णता ही बॉयलरमध्ये गोळा करून वाफे तयार केली जाते आणि या वाफेचा वापर टर्बाइनद्वारे वीज निर्माण करण्यासाठी केला जातो. कंपनीचा वीज वापर झाल्यानंतर उर्वरित वीज एमएसईबीला आवश्यकतेनुसार पुरविली जाते. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे आरोग्य तसेच पर्यावरण लक्षात घेऊन कोरोनाच्या काळात एमएसईबीला वीज निर्मिती करून पुरवठा केला, जेणेकरून लॉकडाऊनच्या काळात विजेअभावी लोकांची गैरसोय होऊ नये.

कंपनी प्रशासन केंद्र व राज्य शासनाने प्रदूषण नियंत्रणासाठी दिलेले नियम, अटी व प्रदूषण मानकांचे पालन करत असून शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्याचे कर्तव्य पार पाडत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here