सह संपादक//उपक्षम रामटेके
📱9890940507
चिमूर तालुक्यामध्ये आता वाहन चालवीने अवघड झाले असून दुचाकी वाहन चालकाला सरसकट दहा हजार रुपये दंड ठोकवीला जात आहे.
वाहतूक पोलिसांनी केलेली कार्यवाही योग्य असली तरी, त्यांनी ठोकविलेला दंड हा सर्व साधारण व्यक्तीला न सोसणारा आहे. दहा हजार रुपयेचा दंड भरताना सर्वसाधारण व्यतीच्या डोळ्यात अश्रू येत आहेत.
उन्हाळा ऋतू चालू असल्याने ग्रामीण भागात लंग्न सराई जोरदार चालू आहे, प्रत्येक गावामध्ये बस जाऊ शकत नसल्याने दुचाकी वाहनाने प्रवास करावा लागतो, कॉलेज विद्यार्थ्यांचे पेपर चालू असल्याने विद्यार्थी सुद्धा दुचाकीने प्रवास करतात परंतु अश्या व्यक्तीवर सुद्धा दंड ठोकवीला जात आहे, एकीकडे दुचाकी वाहन चालकावर दंड वसुल केला जात असताना वाहतूक पोलिसांना ओव्हरलोड असणारे ट्रक, जलद वेगाने धावणाऱ्या ट्रॅव्हल्स त्यामध्ये असणारे अतिरिक्त मनुष्य बळ, रोड वर चालणाऱ्या चारचाकी वाहन याच्यावर का बर कारवाही होताना दिसत नाही हा सर्व सामान्य जनतेला प्रश्न पडला आहे.
वाहतूक पोलिसांनी वस्तू स्थिती व परिस्थिती ची जाणीव समजून दंड वसुल करावे एवढीच विनंती.
दुचाकी वाहन चालवीतना ही काळजी घ्या
1)मद्य(दारू )प्राशन करून वाहन चालवू नका
2)हेल्मेट चा वापर करावा
3)दुचाकी वाहनावर अतिरिक्त ओझे (मनुष्य बळ )नेऊ नये
4)वाहनाचे कागदपत्रे सोबत ठेवावे
5)ड्रायव्हिंग लायसन सोबत ठेवावे




