Home बीड माजलगाव शहरातील भर चौकातील बॅनर प्रकरणी; दोघांना अटक

माजलगाव शहरातील भर चौकातील बॅनर प्रकरणी; दोघांना अटक

90

 

बीड जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ आडे,9075913114

माजलगावात शहरात माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांच्या समर्थनार्थ बॅनर लावल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या बॅनरमध्ये अतिक आणि अशरफचा शहीद असा उल्लेख करण्यात आला होता. उत्तर प्रदेशात हत्या करण्यात आलेले गुंड अतिक अहमद आणि अशरफ यांच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात भर चौकात बॅनर लावण्यात आले होते. आता या प्रकरणी चार जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी दिली आहे.

हिंदू संघटनांकडून पोलिसांना निवेदन : मंगळवारी सकाळी बीडच्या माजलगाव शहरातील एका चौकात अतिक आणि त्याचा भाऊ अशरफच्या समर्थनार्थ पोस्टर लावण्यात आले. पोस्टरमध्ये या दोघांचा शहीद असा उल्लेख करण्यात आला होता. या संदर्भात विश्वहिंदू परिषद बजरंग दलाकडून पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले होते. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे पोस्टर लावल्या प्रकरणी दत्त मंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here