Home चंद्रपूर बांबू पूरवठा करणयास हयगय करणाऱ्या व शासनाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवणाऱ्या वन...

बांबू पूरवठा करणयास हयगय करणाऱ्या व शासनाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवणाऱ्या वन अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करा-संतोष पटकोटवारांचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन

49

 

( सय्यद शब्बीर जागीरदार )
जिवती: चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना कोठारी, तोहोगाव, गडचांदूर, पोंभुरणा या ठिकाणी बूरूड समाज अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत असून हिरव्या बांबू पासुन विविध प्रकारच्या वस्तू तयार करण्याचा हा तयांचा पिढीजात व्यवसाय असल्याने हा व्यवसाय करण्यासाठी त्यांना दररोज हिरव्या बांबूची गरज पडते, हा व्यवसाय करून बूरूड समाजाला ऊतम रितीने व ऊंच मानाने जिवन जगता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रती कुटुंब धारकांना वार्षिक एक हजार पाचशे नग *हिरवा बांबू पुरवठा करण्याचा शासन निर्णय असताना गेल्या दोन वर्षांपासून मा, उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग कार्यालय चंद्रपूर व मा, वनपरिक्षेत्र अधिकारी वनसडी यांना अनेक वेळा पत्रा। द्वारे बांबुची मागणी केली परंतु पत्राला केराची टोपली दाखवण्यात आली, या वन अधिका-याचया हयगयपणामुळे बूरूड समाजातील कामगारांना गरिबीची झड सहन करावी लागत असून उपासमारीची पाळी आली आहे, बांबू पुरवठा अभावी बूरूड कामगारांना नाईलाजाने चोरीछुपे जंगलातील बांबू अवैध मार्गाने* *आनावे लागत आहे व ऊनहातानहात आपल्या जीवाचे रान करावे लागत आहे, या वन अधिक-याचया हयगयपणामुळे दररोज हजारो बांबू ची अवैध कटाई होत आहे व शासनाचा लाखो रुपये* महसूल बूडत आहे, *यात शासनाचा खुप मोठा नुकसान होत आहे बूरूड कामगारांना वेळेवर निसतार बांबू पुरवठा न करणाऱ्या व शासन निर्णयाला धुडकावून लावणा-या वन अधिका-यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी* अशी *लेखी निवेदन शेतकरी संघटनेचे सरचिटणीस तथा माजी ग्राम पंचायत सदस्य, संतोष पटकोटवार यांनी जिल्हा अधिकारी, चंद्रपूर मा, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मूख्य वनसंरक्षक विवृत चंद्रपूर, आमदार किशोर जोरगेवार, चंद्रपूर,माजी आमदार वामनराव चटप राजूरा यांना निवेदनातून मागणी केली आहे,*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here