Home चंद्रपूर पुरोगामी विचार रुजवायचा तर संघटनेची आचारसंहिता असली पाहिजे : डॉ. अल्का ठाकरे

पुरोगामी विचार रुजवायचा तर संघटनेची आचारसंहिता असली पाहिजे : डॉ. अल्का ठाकरे

87

🔸जिल्हासरचिटणीस म्हणून सुरेश गिलोरकर यांची निवड

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.9एप्रिल):-पुरोगामी शिक्षक संघटना ही प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रगण्य संघटना म्हणून नावारूपास येत असताना काही मनभेद जोपासणारी वृत्ती संघटनेच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत असते . त्यामुळे मतभेद बाजूला ठेवून संघटन वाढीसाठी आचारसंहिता असली पाहिजे असे मत राज्य महिला अध्यक्ष डॉ. अल्का ठाकरे यांनी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या मासिक सभेत व्यक्त केला .

प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या व विषयावर आढावा तसेच चर्चा करून नियोजन करण्याकरिता जनता महाविद्यालयात आयोजित सभेला जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार , राज्यनेते विजय भोगेकर , जिल्हा महिलाध्यक्ष विद्या खटी , सल्लागार सुनीता इटनकर , कोष्याध्यक्ष सुनील कोहपरे , कार्याध्यक्ष गंगाधर बोढे , उपाध्यक्ष रवी सोयाम , सुभाष अडवे , राज्यसचिव निखिल तांबोळी , लोमेश येलमुले , सर्व तालुक्यातील अध्यक्ष , सचिव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . त्यांच्या उपस्थितीत सर्वानुमते सुरेश गिलोरकर यांची जिल्हा सरचिटणीस म्हणून निवड करून शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here