Home महाराष्ट्र पांढरकवडा येथे एक दिवशीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर संपन्न

पांढरकवडा येथे एक दिवशीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर संपन्न

190

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

पांढरकवडा(दि.25 मार्च):-दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा,भारतीय बौद्ध महासभा संरक्षण विभाग पांढरकवडा यांच्या वतीने दिनांक 22 मार्च 2023 रोजी यांच्या वतीने एक दिवसीय महिला व पुरुष समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अण्णा मून तालुकाध्यक्ष हे उपस्थित होते . प्रमुख अतिथी म्हणून भगवान इंगळे जिल्हाध्यक्ष पूर्व तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून रवी भगत जिल्हाध्यक्ष पश्चिम हे उपस्थित होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. उत्तम शेंडे (बौध्दाचार्य), केंद्रीय प्रशिक्षक राजेंद्र पांचाग, तसेच इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

या एक दिवशीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिरामध्ये 66 प्रशिक्षणार्थी तालुक्यातील ग्रामीण भागातील करणवाडी ,वाई, गणेशपुर, धारणा, कोंगारा ,तेलंगटाकडी ,उमरी, अकोली, घोंसी ,पहापळ ,बोरगाव कडू ,सोनखास,पारवा, शहरातील सर्व वार्डातील येथील भीमसैनिकांनी समता दल प्रशिक्षणात सहभाग घेतला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. संघरत्ना आठवले ,अभिलाषा नरांजे ,युगधंरा रामटेके, रवी रामटेके, उत्तम काळे,राहुल नरांजे,प्रा.रेखा मुन,परमेश्वर भरणे,भिमराव भगत,अशोक भुजाडे,राजकुमार किटके, तसेच आदीनी अथक परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. उत्तम शेंडे यांनी केले तर सूत्रसंचालन किशोर भाटशंकर यांनी केले तर आभार प्रमोद रामटेके यांनी मानले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी मंडळी तसेच समता सैनिक दलाचे पदाधिकारी मंडळी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.सरणतय गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here