Home महाराष्ट्र सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र

287

🔹सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.24मार्च):-मुंबईतील अंधेरी पूर्व येथील सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी मध्ये बारा वर्षा पासुन नोकरीवर असलेले 53 वर्षीय जगदिश काशिकर यांना कंपनीत पुरेसे काम नसल्याचे कारण देऊन (कौटुंबिक व आर्थिक परिस्थीती समजून न घेता) त्यांना सक्तीने पंधरा मार्च पासून तीन महिन्याची मुदत देऊन सकतीने कंपनीतुन बाहेर जान्यास भाग पाडले आहे  याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना आपली नोकरी वाचवण्या बाबत निवेदन व स्मरणपत्र दिले आहे.

काही वरिष्ठ अधिकारी यांच्या सांगण्या वरून ही कारवाई ईतर कोणत्याही कर्मचार्यांवर कारवाई न करता जाणुन बुजून ही कारवाई करण्यात येत असुन त्यांना त्यांच्या कुवतीनुसार पुरेसे काम देण्याचा प्रयत्न किंवा अन्य खात्यात त्यांना सामाविण्याचा प्रयत्न न करता कोन्ट्राऍक्ट वर असलेल्या कर्मचारी यांना प्राधान्य देऊन जगदीश काशिकर यांना कोन्ट्राएकट वर अर्धा पगारावर काम करण्यास भाग पाडत आहेत.

या प्रकरणाबाबत जगदीश काशिकर न डगमगता व खचुन न जाता कंपनीच्या निर्णयाबाबत सुप्रसिद्ध समाजसेवक, वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी व वकील यांना आपली समस्या सांगून व त्यांच्या सल्ला घेऊन मेडीसन पीआर एजन्सीला जगदीश काशिकर यांच्याबाबत जो चुकिचा निर्णय घेतला आहे तो मागे घेऊन त्यांना चिंतामुक्त करावे याबाबत कायदेशिर सूचना पाठविली आहे. या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी जगदीश काशिकर मुक्त पत्रकार, व्हाटसअप ९७६८४२५७५७ यांच्यासोबत वाचक संपर्क करू शकतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here