Home नागपूर श्री. राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिना निमित्त एक दिवसीय मोफत...

श्री. राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिना निमित्त एक दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिर

92

🔹 वासनिक सोशल फाउंडेशन द्वारा संचालित बालक्रिष्ण न्यूरो मल्टी स्पेशलिस्ट क्लीनिक व पॅथॉलॉजी लॅब व्दारा आयोजित

✒️नागपूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नागपूर(दि.9फेब्रुवारी):- श्री. राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिना निमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये न्युरो /ब्रेन/ स्पाईन/नस/ पोटाचे विकार तपासणी/ रक्त चाचणी /नेत्र तपासणी, नेत्ररोग तपासणी, आधी आजारांवर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी होणार आहे.

तरी (मेंदू व मनका रोग तज्ञ:–डॉक्टर निखिल काकाणी) तसेच (पोट विकार तज्ञ:- डॉक्टर राकेश पाठरबे) व (नेत्ररोग तज्ञ:- डॉक्टर रवी डेकाटे) यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात येणार असून न्युरो/स्माईल नस तपासणी, मेंदू रोग, पोटाचे विकार, नेत्र तपासणी, रक्त चाचणी, मोफत चष्मे वाटप, अत्याधुनिक मोतीबिंदू चाचणी व शस्त्रक्रिया, मधुमेह, रेटीनोपॅथी शस्त्रक्रिया अशा विविध आजारांवर रविवार दिनांक 19 /2/2023 वेळ सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत होणार असून सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे. तरी आपण सर्व भारतीय अशा प्रकारे श्री राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करूया. तरी सर्वांची या शिबिरासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. तरी सर्वांनी नाव नोंदणी करून शिबिराचा लाभ घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here