सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)
चिमूर(दि.9फेब्रुवारी):-राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नगरपरिषद चिमूर येथील मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड होत्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी मोबाईल व्यसनापासून दूर राहावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक नरेंद्र यावले होते. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव विनायकराव कापसे, सहसचिव नारायण डांगाले, कुसुमराव कडवे, श्रीहरी गोहणे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख डॉ. राजेश्वर रहांगडाले यांनी केले. वार्षिकोत्सव 2023 कार्यक्रमाची भूमिका महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. प्रफुल्ल बन्सोड यांनी केली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात मार्गदर्शक कसा असावा यासंदर्भात महाभारतातील विविध उदाहरणे दिले. अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. यावले यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी नियोजनपूर्वक अभ्यास केल्यास यश मिळते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. आशुतोष पोपटे यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. उदय मेंडुलकर यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वर्गानी सहकार्य केले. बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. समारोपीय समारंभास प्रमुख अतिथी म्हणून चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ उर्फ कीर्तीकुमार भांगडिया होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक यावले हे होते. या कार्यक्रमात विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वाटप करण्यात आले.
