Home महाराष्ट्र अभिषेक ठाकुर याना राष्ट्रीय “ग्लोबल ह्यूम्यानिटी पुरस्कार-2023” जाहिर

अभिषेक ठाकुर याना राष्ट्रीय “ग्लोबल ह्यूम्यानिटी पुरस्कार-2023” जाहिर

90

🔹सामाजिक व रक्तदान क्षेत्रातब उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राजस्थान येथे होणार सत्कार

✒️सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ(दि. 9 फेब्रुवारी):-सामाजिक व रक्तदान क्षेत्रात एवढ्या कमी वयात समाजाची निःस्वार्थ कार्यात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे मैत्री परिवार बहुउद्देश्यीय संस्था संस्थापक अध्यक्ष अभी ठाकुर यांनी त्यांचे सामाजिक व रक्तदान क्षेत्रातील उचलले मोलाचं पाऊल यशस्वी ठरत आहे.

समाजाचा विकास व निःस्वार्थ कार्य ही संकल्पना घेऊन उमरखेड येथील अभी ठाकुर हे स्वतःला समाजाप्रती वाहून घेतले आहेत. त्यांच्या कार्याने समाजकार्याची दखल घेऊन, राजस्थान राज्यातील बिकानेर मधील राष्ट्रहित फाऊंडेशन मार्फत 12 मार्च 2023 रोजी एका भव्य दिव्य राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात “ग्लोबल ह्यूम्यानिटी पुरस्कार- 2023” ह्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

काही मानसांत नाते जरी रक्ताचे नसले तरीही माणुसकीच्या नात्याने रक्त देण्यासही मागेपुढे विचार न करणारे निःस्वार्थ विचार यांच्याकडे आहे.

सामाजिक तसेच रक्तदान क्षेत्रातील एक यशस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून अभी ठाकुर याचे नाव घेतलं जाते, ज्या वयात स्वतःचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले जातात त्या वयात यांनी केलेल्या कार्याची दखल घेत यांना सन्मानित करण्यात येणार आहे.. कोरोना महामारीच्या काळातही त्याची सेवा प्रशंसनीय आहे. आयुष्याचाच अर्थ एवढा व्यापक आहे की त्यांच्या प्रत्येक स्पंदनात मानवता सामावलेली आहे.काही मानसांत नाते जरी रक्ताचे नसले तरीही माणुसकीच्या नात्याने रक्त देण्यासही मागेपुढे विचार न करणारे अभी ठाकुर आहेत.

मैत्री परिवार ला या याधी देखील सामाजिक कार्य साठी अनेक राष्ट्रीय,समाजभूषन, आरोग्य सेवक,कोरोना योद्धा अशे अनेक सन्मान सन्मानित आहेत हे सर्व सन्मान त्यांच्य परिवार च्या आशीर्वाद ने व सर्व मित्र मंडळ परिवार च्या साथ मुळे शक्य झाले अशे अभी ठाकुर यानी सांगितले व सर्वांचे आभार मानले व पुढे देखील निःस्वार्थ सामाजिक कार्य सुरु राहतील अशे देखील बोले

कार्यक्रमाचे आयोजन ‘राष्ट्रहित फाऊंडेशन’ बिकानेर राजस्थान चे आयोजक मेवा सिंघ सर पूर्व आर्मी ऑफिसर, व सुचित्रा ताई अहिरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here