Home महाराष्ट्र उमरखेड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटा कडुन चक्का जाम आंदोलन

उमरखेड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटा कडुन चक्का जाम आंदोलन

36

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 9 फेब्रुवारी):-युवा सेना, विद्यार्थी सेना ढाणकी शहर तर्फे छत्रपति शिवाजी महाराज चौक ढाणकी येथे दुपारी बारा वाजता शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

यामध्ये प्रामुख्याने 1) कापसाला प्रतिक्विंटल दहा हजार हमीभाव मिळालाच पाहिजे 2) सोयाबीनला प्रतिक्विंटल 7000 हमीभाव मिळालाच पाहिजे 3) तूर व चना करता नाफेडचे केंद्र त्वरित चालू करण्यात यावी. 4) पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावी यासाठी छत्रपति शिवाजी महाराज चौक ढाणकी येथे मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी व युवासैनिक शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले.

यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय कुंभरवार, मा जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, शिवसेना उमरखेड विधानसभा संघटक प्रशांत जोशी, शिवसेना तालुका संघटक सचिन साखरे, ढाणकी शहर शिवसेना बंटी जाधव , मा सरपंच शिवाजी फाळके, शिवसेना शहर समन्वयक ढाणकी कांता वासमवार, शेतकरी तालुका प्रमुख गणेश नरवाडे, शिवसेना शहर संघटक अमोल अरमाळकर, मा नगरसेवक रमेश पराते, विभाग प्रमुख गजानन गायकवाड, अल्पसंख्याक तालुका प्रमुख एजाजा पटेल, युवासेना तालुका प्रमुख संभाजी गोरटकर, युवासेना सोशल मिडिया तालुका प्रमुख विशाल नरवाडे, मा ग्रामपंचायत सदस्य रमेश होले, शिवसेना सोशल मीडिया प्रमुख ढाणकी गजानन अजेगावकर, उपशहर प्रमुख अशोक कोरतवाड, युवासेना समन्वय शैलेश कारकले,उपशहर प्रमुख बालाजी येरावार, युवासेना उपशहर पिंटू सुरोशे, उपशहर प्रमुख अभय सोनोने, उपतालुका प्रमुख गजानन जाधव, युवासेना विभाग प्रमुख अविनाश नाईकवाडे, उपशहर प्रमुख बजरंग ठाकूर, विभाग प्रमुख गजानन धोपटे, विभाग प्रमुख विजय ठाकूर, युवासेना उपतालुका प्रमुख युराज कलाने, रमेश कदम,साहेबराव शिंदे,नागेश कानिदे,अनिल गायकवाड,युवासेना संघटक तालुका प्रमुख दिलीप जाधव,युवासेना शाखा प्रमुख गांजेगाव दिगंबर मस्के, युवासेना विभाग प्रमुख अनिल तोडक,जांभुळकर संख्येने शिवसेना व युवा सेनेचे कार्यकर्ते चक्काजाम आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here