Home पुणे पोलीस संशोधन केंद्र पुणे यांच्या वतीने लॉ फॉर लेमन अंतर्गत पत्रकारांसाठी एक...

पोलीस संशोधन केंद्र पुणे यांच्या वतीने लॉ फॉर लेमन अंतर्गत पत्रकारांसाठी एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

176

✒️मनोहर गोरगल्ले(पुणे,जिल्हा प्रतिनिधी)

पुणे(दि.9फेब्रुवारी):-पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, क्राईम रिपोर्टर, संपादक व पत्रकार यांना पुणे पोलीस संशोधन केंद्र (CPR) येथे कायद्यांची माहिती व कायद्याच्या अंमलबजावणी पद्धती तसेच पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीची माहिती व्हावी या उद्देशाने एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमात क्राईम रिपोर्टर,संपादक व पत्रकार यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे रामनाथ पोकळे ऍडिशनल सीपी पुणे सिटी, श्री मिलिंद दातरंगे अतिरिक्त अभियोग्यता पुणे कोर्ट, तसेच गीता गोडांबे मॅडम, संदीप गदिया सायबर एक्स्पर्ट पुणे,श्री संभाजी पाटील रिटायर्ड एसीपी यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले, या कार्यक्रमांतर्गत रामनाथ पोकळे साहेब ॲडिशनल एसिपी पुणे यांनी पत्रकार यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.

त्याचप्रमाणे मिलिंद दातरंगे यांनी कायदे विषयक कलमांची माहिती देऊन पत्रकारांना मार्गदर्शन केले. गीता गोडांबे मॅडम यांनी महिला व मुलांवर कशा प्रकारे अत्याचार केले जातात व त्यांच्या वर कोणते गुन्हे दाखल केले जातात याची माहिती दिली. संदीप गदिया सायबर एक्सप्रेस पुणे यांनी सायबर मध्ये कोण कोणत्या प्रकारे फसवणूक केली जाते सायबर गुन्हा म्हणजे काय यावर योग्य असे पत्रकारांना मार्गदर्शन केले. संभाजी पाटील रिटायर्ड एसिपी यांनी पोलीस व नागरिकांची कर्तव्ये याबद्दल सविस्तरपणे सर्व पत्रकारांशी हितगुज करून माहिती दिली.

त्यानंतर सर्व पत्रकारांना प्रशासित पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस पी ज्योती शिरसागर मॅडम यांनी केले तसेच पी आय स्मिता वासनिक मॕडम यांनी पत्रकार यांना योग्य आदरातिथ्य केले.त्यांचे सर्व पत्रकारांनी आभार मानले व धन्यवाद दिले.यावेळी त्यांनी सांगितले की अशा प्रकारची शिबिरे या ठिकाणी कायम आयोजन करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिक महिला व इतर सर्वांनी शिबिरामध्ये भाग घेऊन या ठिकाणी असणारे सर्व प्रकारचे मार्गदर्शन घ्यावे असे सेंटर फॉर पोलीस रिसर्च तर्फे आव्हान करण्यात येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here