




✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.8फेब्रुवारी):-डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन,म्हसवड येथे माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणेत आली यावेळी धम्म बांधव,माता भगिनी,अबालवृद्ध,आणि लहान मुलाची समाज बांधवांची उपस्थिती होतीयावेळी सकाळी नऊ वाजता भारतीय बौध्द महासभा शाखा मान तालुक्याचे बौध्दाचांर्य कुमार सरतापे यांनी बुध्द वंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात केली आणि माता रमाईला अभिवादन करणेत आले.
सायंकाळी पाच वाजनेच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथून अभिवादन फेरीस सुरुवात झाली यावेळी माता रमाईची प्रतिमा घेऊन अभिवादन फेरी ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन ,माता रमाई,महात्मा फुले,सावित्री माई फुले,शाहू महाराज, आन्ना भाऊ साठे यांचा जयघोष करत माळी गल्ली,चांदणी चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,महात्मा फुले चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि सिद्धनाथ चौक मार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे पोहोचली.
या अभिवादन फेरीमध्ये लहान मुलांचा सहभाग ,महिला, पुरुष याचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता हातात निळे झेंडे घेऊन जयघोष करत अभिवादन फेरी शांततेत निघाली होती.भारतीय बौध्द महासभा शाखा मान तालुक्याच्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेणेत आला यावेळी बुध्द विहार समन्वय समिती याचे मार्फत घेणेत आलेल्या पाली भाषा प्रचार परीक्षा घेणेत आली होती त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सरकार करणेत आला.यावेळी भारतीय बौध्द महासभा शाखा सातारा जिल्हा कार्यकारिणी कोषाध्यक्ष म्हणून निवड झालेले नंदकुमार शिंदे यांचाही यावेळी सत्काकार करणेत आला.
यानंतर लहान मुलांनी माता रमाई बद्दल आपले मनोगत व्यक्त केली.नंदकुमार शिंदे,केंद्रीय शिक्षिका शोभाताई बनसोडे,आणि मान भारतीय बौध्द महासभा शाखा मान तालुका अध्यक्ष सिधार्थ बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून माता रमाई याच्या त्यागा बद्दल माहिती दिली.यावेळी भारतीय बौध्द महासभा शाखा मान तालुका सचिव श्रीमंत भोसले, बौध्दाचांर्य बाळासाहेब सरतापे, बौध्दाचांर्य कुमार सरतापे,पत्रकार एक के सरतापे,शिवदास सरतापे,सचिन सरतापे,अरुण सरतापे,योगेश सरतापे,अंगुली बनसोडे,रामभाऊ फुटांकर,जयंती अध्यक्ष आकाश सरतापे,नितीन सरतापे धम्म माता भगिनी आणि बांधव उपस्थित होते.




