Home महाराष्ट्र मोर्शी येथे आमदार चषक 2023 उत्साहात साजरा !

मोर्शी येथे आमदार चषक 2023 उत्साहात साजरा !

37

🔸हजारो युवकांचा आमदार चषकाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

🔹आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.8फेब्रुवारी):-आमदार देवेंद्र भुयार यांचा वाढदिवस आमदार देवेंद्र भुयार यांच्या समर्थकांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले होते. आमदार देवेंद्र भुयार यांचा वाढदिवस अभूतपूर्व साजरा करण्यासाठी देवेंद्र भुयार समर्थकांनी कंबर कसली. मागील दोन वर्षांपासून विधानसभा निवडणूक व कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देवेंद्र भुयार समर्थकांना व कार्यकर्त्यांना आमदारांचा वाढविवस साजरा करता आला नव्हता. यामुळे यावर्षी आमदार देवेंद्र भुयार यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून मोठया उत्साहात विविध समाजपयोगी उपक्रम राबऊन साजरा करण्यात आला.

मोर्शी तालुक्यामध्ये आमदार देवेंद्र भुयार यांच्या वाढदिवसानिमित्त मोर्शी येथे दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ या दरम्यान “आमदार चषक महोत्सव 2023” चे भव्य आयोजन करून मोर्शी तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, आणि क्रीडात्मक गुणांना वाव मिळण्यासाठी तसेच त्यांचे कौशल्य विकसित होण्यासाठी गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, नृत्यप्रकार, मॅरोथन स्पर्धा यासह विविध सोर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या सर्व स्पर्धामध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते प्रोत्साहनपर बक्षीस वितरित करण्यात आले आणि स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

तसेच मतदार संघातील विविध क्षेत्रात विशेत: प्राविण्यप्राप्त कलाकारांचा, खेळाडूंचा, प्रशिक्षकांचा, रुग्णसेवक यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी आमदार चषक 2023 स्पर्धेमध्ये उस्फुर्तपणे सहभाग घेण्याऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे, आयोजन मंडळातील सदस्य, युवा एकता मंच प्रशिक्षकांचे आणि शिक्षकवृंद, पालकवृंद तसेच सर्व सहकाऱ्यांचे मनापासुन आभार मानले आणि विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here