Home चंद्रपूर शासन स्तरावर शाळा महाविद्यालयातून शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात यावा

शासन स्तरावर शाळा महाविद्यालयातून शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात यावा

0

🔸शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्र ची मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.4फेब्रुवारी):–महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ.शिवाजी महाराज यांची जयंती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर १९ फेब्रुवारी रोजी जगभर साजरी होत असते.

छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहचण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा महाविद्यालयांमधून शिवजयंती निमित्ये विविध कार्यक्रम जसे – शिवचरित्रावर स्पर्धा परिक्षा, वकृत्व स्पर्धा, वेषभुषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा,गडकिल्ले नमुने निर्माण स्पर्धा… इ. विविध उपक्रमांचे आयोजन प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये करुन दरवर्षी १९ फेब्रुवारी शिवजयंती दिनी मुख्य शिवजयंतीचा कार्यक्रम घेवून त्या कार्यक्रामात प्रोत्साहन पर बक्षिस वितरन करण्यास महाराष्ट्र शासनाचे शिक्षण मंत्रालयाकडून परिपत्रक काढून १९ फेब्रुवारी २०२३ पासून शासकीय स्तरावर प्रत्येक शाळा महाविद्यालयांमधून शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात यावा यासाठी शिक्षणमहर्षी डाॕ. पंजाबराव देशमुख शिक्षकपरिषदेने महाराष्ट्राचे मा.राज्यपाल, मा.मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली असल्याची माहिती शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्राचे राज्यउपाध्यक्ष रामचंद्र सालेकर यांनी दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here