Home महाराष्ट्र दलित महिलेच्या हत्येतील आरोपी अजूनही मोकाट

दलित महिलेच्या हत्येतील आरोपी अजूनही मोकाट

111

🔹आरोपीला अटक करा अन्यथा रस्त्यावर उतरू

🔸मातंग समाज अन्याय निवारन समितीचे तहसीलदारा मार्फतीने गृहमंत्र्यांना निवेदन

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.31जानेवारी):-जिवती तालुक्यातील पल्लेझरी गावातील दलित महिला सौं. मीरा गुरुदेव सहारे यांची दिनांक 24/01/2023 रोजी निर्घृण हत्या करून आरोपी नामे शिवाजी राठोड वय 20 वर्षे हा फरार झालेला होता.आज सहा दिवस झाले असून आरोपी अजूनही फरार असल्याने समाजातून संताप व्यक्त केला जात असून आरोपीचा लवकरात लवकर शोध घ्यावा या मागणीचे निवेदन आज दिनांक 30.1.2023 रोजी मा.तहसीलदार जिवती यांच्या मार्फतीने मा. गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिलेले आहे.

निवेदनामध्ये आरोपी ला पकडून सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी मातंग समाज अन्याय निवारण समिती च्या वतीने करण्यात आलेली आहे.यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि समाज बांधव उपस्थित होते. त्यामध्ये संघटनेचे संयोजक प्रा. सुग्रीव गोतावळे, श्री दत्ता गायकवाड, श्री. तानाजी कांबळे, श्री दशरथ कुंटेवाड श्री रोहिदास तोगरे, , श्री भगवान गायकवाड, श्री. पद्माकर पोतवळे, श्री बालाजी कांबळे, श्री अंबादास गोतावळे तसेच इतरही कार्यकर्ते उपस्थित होते. आरोपीस लवकर अटक करण्यात यावी नाहीतर समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here