




✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कराड(दि.31जानेवारी):-ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय उंडाळे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर घोगाव गाव येथे सुरू आहे. या शिबिरामध्ये आरोग्य संवर्धन काळाची गरज या विषयावर श्री किरण कांबळे हे बोलत होते. या शिबिरामध्येच नेत्र तपासणी व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी हे उद्गार काढले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये स्वयंसेवक आपल्या श्रमदानातून गावाचा कायापालट करण्याचा प्रयत्न करतात. गावांमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात त्यामधील एक उल्लेखनीय उपक्रम म्हणजे गावातील लोकांच्या डोळ्यांची तपासणी आणि रक्त तपासणी शिबिराचे आयोजन या श्रमसंस्कार शिबिरामध्ये करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय उंडाळे येथील डॉक्टर एस वाय पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ग्रामस्थांच्या डोळ्याची तपासणी तसेच रक्त तपासणी करण्यात आली. याचा ग्रामस्थांना चांगल्या प्रकारे लाभ झाला.
असेच उपक्रम राबवली जावेत आणि गावातील लोकांना विविध शासकीय योजना, आरोग्यविषयक, शेती विषयक, जलसंधारणाविषयक अशा योजनांची माहिती व्हावी याचे नियोजन या शिबिरामध्ये करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणजे आरोग्य संवर्धन ही काळाची गरज या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानास अध्यक्ष श्री मानाजी चंदन माने तर प्रमुख उपस्थिती संपत सूर्यवंशी आणि जयवंत शेवाळे होते. या कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प अधिकारी प्रा.प्रदीप चोपडे , सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रा. हणमंत पिसाळ, स्वयंसेवक आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी केले.




