Home महाराष्ट्र भारतीय विद्यार्थी मोर्चाची सातारा जिल्हा कार्यकारिणी जाहीर…!

भारतीय विद्यार्थी मोर्चाची सातारा जिल्हा कार्यकारिणी जाहीर…!

58

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

🔹जिल्हाध्यक्ष पदी मा.कुणाल देवकुळे यांची निवड..!

म्हसवड(दि.30जानेवारी):-भारतीय विद्यार्थी मोर्चा हे गैरराजनितिक व राष्ट्रव्यापी संघटन असुन बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी निर्माण केलेले संघटन आहे.भारतीय विद्यार्थी मोर्चाची स्थापना 11 एप्रिल रोजी सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आली आहे.भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून शिव फुले शाहू आंबेडकर आण्णा भाऊ साठे सर्व बहुजन समाजातील जन्मलेल्या सर्व क्रांतिकारी महापुरुषांचे,महामातांचे, महानसंताचे अपुर्ण राहिलेले आंदोलन आणि स्वप्न पुर्ण करण्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा निर्माण केला गेला आहे.

भारतीय विद्यार्थी मोर्चाचा मुख्य उद्देशच बहुजन समाजातील प्रत्येक जात सुमहामधील विद्यार्थ्यांमध्ये युवा नेतृत्व निर्माण करणे होय हाच आहे.व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला विद्यार्थी घडवण्याच काम भारतीय विद्यार्थी मोर्चा कडुन बहुजन समाजामध्ये चालू आहे.दि.29 जानेवारी रोजी भारतीय विद्यार्थी मोर्चाची जिल्हास्तरीय मिटिंग सातारा शहरात जिल्हाध्यक्ष बामसेफ सातारा मा.अमर कांबळे सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

2023 मधील नवीन वर्षाची जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी मा.कुणाल देवकुळे यांची निवड झाली तसेच जिल्हा कार्याध्यक्ष पदी मा.आशिष वीर यांची निवड झाली.भारतीय विद्यार्थी छात्रावास संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी मा.आदित्य लोखंडे यांची निवड झाली.जिल्हा संयोजक मा.किशोर खरात, जिल्हा उपाध्यक्ष मा.मंगेश लोखंडे, जिल्हा सोशल मिडिया महासचिव मा.रोहित नितनवरे, जिल्हा सदस्य मा.प्रज्वल आवडे, इरफान महात,शुभम भंडारे,सनी भोसले,अमन दफेदार,इ.कार्यकर्ता तथा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली सर्व कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्ष बामसेफ सातारा मा.अमर कांबळे सरांनकडुन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी उपस्थित पदाधिकारी प्रदेश महासचिव संघटक मा.प्रथमेश ठोंबरे, संपर्क महासचिव मा.चेतन आवडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here